Mulund Demolition Drive: बीएमसीने मुलुंडच्या अमरनगर परिसरातली १५० अनधिकृत घरं आणि दुकानं पाडली आहेत. आणखीही बांधकामांवर लवकरच पुढील कारवाई होणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या कामाला महापालिकेकडून वेग आला आहे. त्याअंतर्गत रविवारी ३१ मे रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुलुंडमधील खिंडीपाडा परिसरातील अमरनगर येथे मोठी कारवाई केली. या पाडकाम मोहिमेत सुमारे १५० अनधिकृत निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर हातोडा पडला आहे. ही कारवाई टी वॉर्डच्या अतिक्रमण तोडक पथकाने केली. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या मार्गात येणारी अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गासाठी जागा उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासनाने काय सांगितले?
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडण्यात आलेली बांधकामे ही प्रकल्पाच्या निश्चित मार्गात येत होती. त्यामुळे ती हटवणे आवश्यक होते. या भागात अद्याप २३४ अनधिकृत बांधकामे शिल्लक आहेत. त्यांच्यावरही पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा लवकरच राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोलिस बंदोबस्तात कारवाई
झोन ६ चे उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. कारवाईदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Hydrogen Train: जगात पहिल्यांदा ‘हायड्रोजन ट्रेन’ चालवणारा जर्मनीच मागे हटला, मग भारत का घेतोय एवढी मोठी जोखीम?
प्रवास जलद होणार, कोंडी कमी होणार
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक जलद होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून त्यासाठी आवश्यक कामांना महापालिकेकडून गती देण्यात येत आहे.
आणखी किती कारवाया?
दरम्यान, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पूर्व-पश्चिम प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा वेळ खर्च करावा लागतो. प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा