• Tue. Jun 16th, 2026
    NEET Paper Leak: पापाचा घडा भरला! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीची चार मजली इमारत भुईसपाट

    PV Kulkarni, NEET Scam Mastermind: नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील चार मजली अनधिकृत इमारतीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. सीबीआय तपासानंतर ही दुसरी त्याच्याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव बीड: देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा वेग वाढविला दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून समोर आलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीड शहरातील मालमत्तेवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. शहरातील शाहूनगर भागात सुरू असलेल्या त्याच्या चार मजली इमारतीच्या बांधकामावर अखेर हातोडा चालविण्यात आला आहे.

    त्याच ठेकेदाराने पाडले बांधकाम

    नगरपालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे ठेकेदाराला ते स्वतःहून पाडून घेण्याची नोटीस बजावली होती. या नोटीसीची मुदत संपल्यानंतर आजपासून प्रत्यक्ष पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराकडूनच हे बांधकाम हटविले जात आहे.

    कारवाईमागचे कारण काय?

    नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. त्यात पी. व्ही. कुलकर्णी याचे नाव समोर आल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या बीडमधील मालमत्तांचीही चौकशी सुरू झाली.

    Maharashtra TimesNashik MLC Election 2026: नाशिकमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाचाच अपक्ष अर्ज; महायुतीची डोकेदुखी वाढणार?

    शाहूनगर येथील बांधकाम नियमबाह्य आढळून आल्याने पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून अनधिकृत बांधकाम हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा आता मोठा फटका कुलकर्णीला बसल्याचे मानले जात आहे.

    नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालकांचेही नुकसान

    नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी वर्षभर रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जातात. मात्र पैशांच्या जोरावर प्रश्नपत्रिका फुटत असतील, तर त्याचा सर्वात मोठा फटका मेहनती विद्यार्थ्यांनाच बसतो. त्यामुळेच या घोटाळ्यातील आरोपींवर होत असलेल्या कारवाईकडे संताप आणि समाधान या दोन्ही भावनांनी पाहिले जात आहे. सीबीआयच्या तपासात पी. व्ही. कुलकर्णी हा प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले असून त्याच्यासह आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. काही आरोपी सीबीआय कोठडीत असून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी देशभरातून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा