विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना आणि जळगाव या जागांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. या दोन्ही जागांवर आता भाजप निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत गेले होते. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. ही बैठक संपवून देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर काही वेळाने भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये अनेक जागांवरुन चुरस होती. पण अखेर 16 पैकी तब्बल 11 जागांचे उमेदवार जाहीर करुन भाजप हाच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं भाजपने सिद्ध केलं आहे. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने भाजपने या सर्व जागांवर आग्रह केला होता. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेबाबात मोठा सस्पेन्स होता. या जागेवर नेमंक कोण लढणार? हे अजूनपर्यंत समजू शकलेलं नव्हतं. पण आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटली आणि उमेदवारी कोण लढवणार? याचंदेखील उत्तर मिळालं आहे.
भाजपकडून वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषदेच्या जागेसाठी अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अमरावतीच्या जागेसाठी प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रवीण पोटे यांनी याआधीच उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. पण त्यांची अधिकृत उमेदवारी आज जाहीर झाली आहे.
भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या जागेसाठी अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अविनाश यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना अत्यंत चुरशीची लढत दिली होती. अवघ्या अडीचशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पक्षाने आता त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे.
सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सांगली-सातारा जागेतून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपात नुकतेच प्रवेश करणारे प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सस्पेन्सवर पडदा
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना जागेबाबात महायुतीमधील शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु होती. या जागेवर आधी शिवसेनेचे आमदार असल्याने शिवसेनेकडून या जागेवर दावा सांगितला जात होता. तर दुसरीकडे भाजपने संख्याबळचे कारण देत जागा आपल्याकडे मिळवण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नात भाजपला यश आलं आहे. ही जागा भाजपच्या पदरात पडली आहे. भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जळगावच्या जागेबाबतही मोठा सस्पेन्स होता. स्थानिक शिवसेनेचे आमदार जळगावच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची गुप्त बैठक देखील पार पडली होती. या बैठकीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा निर्णय झाला होता. पण त्यानंतर याबाबत कोणत्याही चर्चा समोर आल्या नव्हता. अखेर भाजपकडून जळगावच्या जागेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नांदेडमधून अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धाराशिव-लातूरमधून बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नागपूरच्या पोटनिवडणुकीसाठी राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस अजून, अर्ज दाखल करण्याची वेळ ही दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा