• Sun. Jun 7th, 2026

    ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 31, 2026
    ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    मुंबई दि. ३१ :- ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक देदिप्यमान सुवर्ण पर्व संपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपट संगीताच्या विश्वात सुमनताईंनी आपला अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे हक्काचे स्थान निर्माण केले. साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed