• Mon. Jun 15th, 2026
    Nanded Crime : शेअर मार्केटचा नाद महागात पडला; खरं सोन्याच्या जागी बनावट सोनं, 80 तोळ्याचे दागिने लंपास; SBI बँक अधिकाऱ्यांचा कारनामा

    Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    नांदेड एसबीआय सोनं चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरातील एसबीआय बँकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या ग्राहकांच्या 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजरने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या ऑडिट दरम्यान हा अपहार उघडकीस आल्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे या अधिकाऱ्यांनी चोरी केलेलं सोनं शहरातील वेगवेगळ्या बँकेत ठेवून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत खोटं सोनं लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती आहे. या अपहार प्रकरणानं खळबळ उडाली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    शहरातील डॉक्टर लेन परिसरात एसबीआय बँकेची शाखा असून जीवन जगदाळे हे सर्व्हिस मॅनेजर आणि आदित्य सेनगावकर हे कॅश मॅनेजरपदी कार्यरत आहेत. शेकडो ग्राहकांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. याचदरम्यान मागील एक वर्षात जगदाळे आणि सेनगावकर यांनी आपल्या पदाचा फायदा घेत आणि पैशांच्या लालचेत येऊन बँकेत ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं काढून घेतलं. काही सोनं विकलं तर काही सोनं इतर बँकेत तारण ठेवून लाखो रुपयाचं कर्ज घेतलं आणि आलेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला.
    Maharashtra TimesHingoli Earthquake : मोठा गूढ आवाज आला अन् जमीन हादरली, नागरिक भेदरले, हिंगोलीतील गावांना भूकंपाचा धक्का
    शेअर मार्केटमध्ये त्यांना मोठा फटका बसला. या प्रकारानंतर आपला कारनामा उघडकीस येऊ नये म्हणून या अधिकाऱ्यांनी 40 तोळे बनावट सोनं लॉकरमध्ये ठेवलं. जेव्हा बँकेचे अधिकाऱ्यांनी ऑडिट केलं, तेव्हा 85 लाख 81 हजार रुपयांचा अपहार उघडकीस आला. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक राजीव कदम यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात अपहार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
    Maharashtra TimesMLC Election : विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रसिद्ध डॉक्टरांचं नाव जाहीर, पक्षाच्या बड्या नेत्याची ट्विटद्वारे घोषणा; नेमकं कोण?

    पती बेपत्ता असल्याची तक्रार

    धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकर हा प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच फरार झाल्याची माहिती आहे. आरोपीच्या पत्नीने काही दिवसापूर्वी वजीराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केल्याची माहिती आहे. फसवणूकीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जीवन जगदाळे याला ताब्यात घेतलं आहे. आज रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत. पैशांच्या लालचेपोटी बँक अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारणाम्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा