• Sun. Jun 14th, 2026

    Manoj Jarange Patil: अन्यथा, पुन्हा रणशिंग फुंकणार; जरांगेंनी उपोषण सोडलं, पण सरकारला दिला नवा इशारा!

    Manoj Jarange Patil: अन्यथा, पुन्हा रणशिंग फुंकणार; जरांगेंनी उपोषण सोडलं, पण सरकारला दिला नवा इशारा!

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर ‘हैदराबाद गॅझेट’नुसार जात प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची लेखी हमी मिळाल्याने उपोषण स्थगित केले, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारने मुदतीत मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही केली नाही, तर पुन्हा संघर्षाचे रणशिंग फुंकण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

    मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे उन्हात बसून उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टाईनंतर त्यांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतले.

    ‘सरकारच्या शिष्टमंडळाने ५८ लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देण्याचे आणि हैदराबाद गॅझेटनुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. प्रमाणपत्र वितरणात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, सातारा संस्थानासंदर्भात महिनाभरात शासन निर्णय काढण्यात येईल, शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जाईल, तसेच ओबीसी मंत्रालयाच्या धर्तीवर मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन सरकारने दिले आहे, असे जरांगे म्हणाले. जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश रोखले जाणार नाहीत. तसेच मान्य केलेल्या मागण्यांबाबत तातडीने अधिसूचना काढण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी करावी; अन्यथा, पुन्हा लढा उभारण्यास सज्ज असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी रुग्णालयात जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

    वडेट्टीवार, मुंडे यांच्यावर टीका

    काँग्रेसच्या सत्ता काळात ओबीसी आणि मराठा समाजाचे नुकसान झाल्याचा आरोप जरांगे यांनी केला. विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांमुळे महाराष्ट्रात काँग्रेस संपुष्टात येत असल्याची टीकाही त्यांनी केली. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता ‘परळीचा नेता’ असा उल्लेख केला. माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा, मला जेवणातून विष देऊन मारण्याचा कट नेमका कोणाचा होता, हेही स्पष्ट होईल, असे जरांगे म्हणाले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *