Reel Star Rohini Paradhye Husband Nilesh FB Post : हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण आणि रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. तिचा पती निलेश याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
‘माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं’
सगळं सुरळीत सुरू असताना तिने टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहिणीचा पती निलेशने तिच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर करत दोघांचे फोटो देखील सोशल मिडीयावर टाकले आहेत. ‘माझी बायको, माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं…’ अशी पोस्ट फेसबुकवर पोस्ट करत निलेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
Pune Crime: सोलापुरातून पुण्यात आला, योगेशचा झाला ‘सिकंदर’; २२ जणांचा जीव घेणाऱ्या तरुणाबद्दल धक्कादायक माहिती
निलेश पराध्येची भावूक पोस्ट
पोस्टमध्ये निलेशने म्हटलं आहे की, ‘माझी बायको, माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग…! या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं’.
‘आज चांगले दिवस यायला लागले होते…आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता…पण त्याचवेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम…सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे…परत ये गं…तुला खूप काही सांगायचं बाकी आहे…तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे…’, अशी पोस्ट निलेशन फेसबुकवर केलीय.
Pune News : पुणे विषारी दारुकांड; 19 कुटुंबाचा आधार हरपला, सरकारकडून कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत, अजून एक मोठं आश्वासन
नेमकं प्रकरण काय?
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये या जोडीने मिळून हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं होतं. ढवरा मटन थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती. रोहिणी स्वत: हॉटेलचं किचनचं काम पाहत होती. याच हॉटेलमध्ये ती रिल्स बनवून गही अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. पण, कुणाला ठावूक असं काही घडेल. 26 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. रोहिणीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर तिला तातडीने मंगळवेढा इथं नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.
