Bhiwandi FDA Raid: या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश राजेंद्र व्हानकडे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बेलाटी लमाण तांडा येथील रहिवासी आहे. तो मागील तीन वर्षांपासून बेकायदा दारू विक्री व्यवसायात सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित कंपनीचे कार्यालय वाशी येथे तर गोदाम अनंत अँड कंपनी, गाळा नंबर ५४४/ए, म्हात्रे कंपाउंड, अंजुर रोड, वळगाव भिवंडी येथे असल्याचे कळताच ठाणे येथील औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी धाड घातली. यावेळी कंपनीचे मालक अरुणकुमार वअभिषेक अरुणकुमार चौबे उपस्थित नव्हते. त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतल्याचे कळते. कारवाईवेळी गोदामात विषारी द्रव्याची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती.
Mumbai Crime: भरलेल्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅसचोरी! खारमधील प्रकार; डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल
साठा नोंदवहीही आढळली नाही. चौबे पितापुत्राविरोधात भिवंडी येथील नारपोली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तसेच ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने विषारीद्रव्य अधिनियमातंर्गत कारणे दाखवा नोटीस देऊन परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे.
योगेशने धारण केले काल्पनिक नाव
पुणे : विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने खरी ओळख लपविण्यासाठी चक्क ‘सिकंदर राठोड’ हे काल्पनिक नाव धारण केल्याचे तपासात उघड झाले आहे. मागील तीन वर्षांपासून बेकायदा दारू विक्रीचा काळा धंदा करताना पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो खोट्या नावाने वावरत होता.
बळींची संख्या २२वर
पुणे : पुणे आणि परिसरातील विषारी दारूकांडातील बळींची संख्या २२ झाली आहे. शनिवारी ससाणेनगरातील एकाचा तर फुगेवाडीतील दोघांचा मृत्यू झाला. विषारी दारूकांड प्रकरणात हडपसर आणि दापोडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
Harshwardhan Sapkal: गृह खाते ‘पांडू हवालदार’ चालवतो! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
