• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Crime: भरलेल्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅसचोरी! खारमधील प्रकार; डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

    Mumbai Crime: हे कृत्य स्वतःच्या जीवितास आणि सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    खार गॅसचोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : खारमध्ये पोलिसांनी सिलिंडरमधून केली जाणारी गॅसचोरी उघडकीस आणली आहे. एका एजन्सीचा कर्मचारी टेम्पोमध्येच भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना पोलिसांनी त्याला हटकले. पोलिसांनी टेम्पोतील भरलेल्या सिलिंडरचे वजन केले असता त्यामध्ये गॅस कमी असल्याचे दिसताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून ४० सिलिंडर हस्तगत केले.

    खार पश्चिमेला पी. डी. हिंदुजा रोडवर एका टेम्पोमध्ये गॅस सिलिंडरमध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती दादर येथील लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर खार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या मागील शटर बंद करून आतमध्ये सिलिंडर हलविण्याचा आवाज येत होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी हे शटर उघडताच काळूराम बेनीवाल हे तरुण गॅसचोरी करीत असल्याचे आढळले. भरलेल्या सिलिंडरचे सील उघडून त्यातून नळीच्या साहाय्याने गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये तो भरत होता. याबाबत हटकताच काळूराम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

    Maharashtra TimesHarshwardhan Sapkal: गृह खाते ‘पांडू हवालदार’ चालवतो! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
    पोलिसांनी टेम्पोमधील भरलेल्या काही सिलिंडरचे वजन काट्यावर केले असता पाच ते कमी भरले. टेम्पोमध्ये ४० सिलिंडरचा साठा होता. प्रत्येक सिलिंडरची तपासणी करीत असताना संधी साधत काळूराम याने पळ काढला. गॅस सिलिंडरचा अद्याप तुटवडा असताना काळूराम याच्याकडून अशाप्रकारे गॅसचोरी केली जात असल्याने याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. काळूरामविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, तरल पेट्रोलियम गॅस (आपूर्ती आणि वितरण) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ४० सिलिंडर हस्तगत केले. यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दुसरा मोठा दणका! अवैध औषध उत्पादकांवर धाडी, भ्रामक जाहिराती भोवल्या, 73 लाखांचा माल जप्त
    धोकादायक प्रकार

    भरलेल्या सिलिंडरमधील थोडा थोडा गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून या सिलिंडरची विक्री चढ्या दराने केली जात होती. केवळ एका नळीच्या साहाय्याने अशा प्रकारे गॅस भरणे धोकादायक आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा