Asangaon Kasara block: मध्य रेल्वेकडून २ ते ५ जूनदरम्यान कसारा-इगतपुरी सेक्शनमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून अनेक गाड्या आसनगावपर्यंतच धावणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईमध्ये लोकलचे काही ना काही कामे सुरु असतात. आता सध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ताजी अपडेट आली आहे.मध्य रेल्वेकडून कसारा-इगतपुरी सेक्शनमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. २ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३.५० ते ५.५० या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. हा ब्लॉक कसारा-खर्डी दरम्यान अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन आणि थळ घाट रिव्हर्सल केबिन परिसरात घेण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
काही लोकल आसनगावपर्यंतच धावणार
या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या N19, N21 आणि N23 या कसारा लोकल आता आसनगावपर्यंतच धावतील. या गाड्या अनुक्रमे दुपारी १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सीएसएमटीवरून सुटतील.
तर कसाराहून सुटणाऱ्या काही लोकल आता आसनगावहून पुढे सीएसएमटीसाठी रवाना होतील. N24 लोकल आसनगावहून ४.१२ वाजता, N26 लोकल ४.५४ वाजता आणि N28 लोकल ५.३९ वाजता सुटणार आहे.
Nanded News: कार्यकर्त्याच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून शिंदे गहिवरले, निवडणुकीत विकलेली शेती शिवसैनिकाला मिळवून दिली
ब्लॉकपूर्वी आणि नंतरच्या महत्त्वाच्या लोकल
ब्लॉकपूर्वी कसारासाठीची शेवटची लोकल N17 असेल. ही लोकल सीएसएमटीवरून दुपारी १२.३० वाजता सुटेल. तर ब्लॉकपूर्वी सीएसएमटीसाठीची शेवटची लोकल N22 असून ती कसाराहून दुपारी २.४२ वाजता रवाना होईल.
ब्लॉकनंतर कसारासाठीची पहिली लोकल N25 असून ती सायंकाळी ४.५० वाजता सीएसएमटीवरून सुटेल. तर ब्लॉकनंतर सीएसएमटीसाठीची पहिली लोकल N30 ही कसाराहून सायंकाळी ६.१७ वाजता रवाना होणार आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
मध्य रेल्वेकडून पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा