• Sun. Jun 7th, 2026
    MLC Election 2026 : पडद्यामागे घडामोडी, बैठकीतली इनसाईड स्टोरी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

    विधान परिषदेच्या निवडणुतकीसाठी आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 17 पैकी 15 जागांवर महायुतीच्या तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : विधान परिषदेच्या 16 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “जागावाटपाबाबत दोन दिवसांपूर्वी प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर आज जागावाटपाच्या निमित्ताने बैठक संपन्न झाली. या 17 पैकी 15 जागांवर आमचे जागावाटपबाबत एकमत झाले आहे. दोन जागांवर अद्याप चर्चा सुरु आहे. येणाऱ्या दोन दिवसांत या दोन जागांबाबत निर्णय होईल. नांदेड आणि नाशिक या जागांबाबत तीनही पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात दोन जागा वगळता इतर ठिकाणी आम्ही जागावाटपाच्या अनुषंगाने निर्णय घेतला आहे”, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

    “काँग्रेस आठ ठिकाणी निवडणूक लढणार आहे. यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर या आठ जागांवर आणि पोटनिवडणूक असलेल्या नागपूरच्या जागेवर निवडणूक लढणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार ठिकाणी लढत आहे. रत्नागिरी, जळगाव, पभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन ठिकाणी लढत आहेत”, अशीदेखील महत्त्वाची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

    लोकशाही वाचवण्याकरता निवडणूक लढवच असल्याचा सपकाळांचा दावा

    “या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जात आहोत. भाजपच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता आणि सुसंस्कृत सभ्यपणा टिकवण्याकरता या निवडणुकीला सामोरे जात आहोत. संविधानिक मुल्य आणि महाराष्ट्र धर्म जागर करुन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत”, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.

    सपकाळ यांचा महायुतीवर घोडेबाजारचा आरोप

    “या निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होणार आहे. बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोते, ट्रकच्या ट्रक भरुन पैसा ओतला जाणार आहे. पैसा फेक तमाशा देख असा तमाशा मांडलेला आहे. नव्हे नव्हे अनेक ठिकाणी 5 लाख एडव्हान्स देवून नगरसेवकांना उचलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पैशांच्या वापरात आणि घोडेबाजारात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी देखील आपापल्या मित्रपक्षाचे मतदार पळवत आहेत”, असा आरोप सपकाळ यांनी केला.

    “स्वत:च्या पक्षाच्या मतदारांना पैसे दिल्याशिवाय चालणार नाही इथपर्यंत हा घोडेबाजार गेला आहे. बाप बडा न भैया सबसे बडा रुपया असं चित्र महायुतीने निर्माण करुन ठेवलं आहे. या संदर्भात चिंता व्यक्त करणे साहजिक आहे. यश-पराजय आपल्या ठिकाणी आहे. निवडणूक आपल्या ठिकाणी आहेत. पण तमाम जनतेला आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी साद घालत आहोत”, असं आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा