नागपूर : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना केंद्रातील भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर तसेच इंधन तुटवड्याच्या परिस्थितीवर तीव्र टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले की, “येत्या दीड महिन्यात पेट्रोलचे दर १७० रुपये तर डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, त्यावरून देश आर्थिक खड्ड्यात जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्य माणूस पूर्णपणे भरडला जात आहे. सरकार जनतेला वाचवण्यासाठी नाही तर मारण्यासाठीच आले आहे. जर इंधनाचा तुटवडा नाही, असे सरकार आणि भाजप नेते सांगत असतील, तर काही ठिकाणी आरसी बुक पाहून डिझेल का दिले जात आहे? शेतकरी शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतो, त्यालाही आरसी बुक दाखवावे लागत असेल तर परिस्थिती गंभीर आहे, हे मान्य करावे लागेल,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
देशात आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देत विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकांनी सध्या असलेले पैसे सुरक्षित ठेवावेत. फार मोठ्या गुंतवणुका करू नयेत. भविष्यात आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकते. बँकांची परिस्थिती चिंताजनक आहे. रिझर्व्ह बँकेचाही पैसा सरकार स्वतःच्या मालकीचा असल्यासारखा वापरत आहे, असा दावाही त्यांनी केला.
मराठा आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “जरांगे पाटील वारंवार आंदोलन करत आहे. वाटण्याच्या अक्षदा लावण्याचं काम झालं आहे. जीआर काढायचा पण अंमलबजावणी करायची नाही. त्यांचा विषय घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. आम्ही ओबीसींसाठी काही मागू तेव्हा काही बोलू नका आणि ते मराठ्याच मागत असतील तर आम्ही तेव्हा बोलणार नाही. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट केलेली आहे, कोणाला द्यायला काही शिल्लक राहिलेलं नाही,” असंही वडेट्टीवार म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा