• Sat. Jun 6th, 2026

    Beed Crime : लेकीच्या लग्नासासाठी लाखोंचा खर्च, आयुष्यभराची जमापुंजी लावली, बोहल्यावर चढण्याआधीच PSI नवरदेवाचा लग्नास नकार; बीडमध्ये काय घडलं?

    Beed Crime : लेकीच्या लग्नासासाठी लाखोंचा खर्च, आयुष्यभराची जमापुंजी लावली, बोहल्यावर चढण्याआधीच PSI नवरदेवाचा लग्नास नकार; बीडमध्ये काय घडलं?

    Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढच चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    पीएसआय पवन निंबाळकर लग्नाला नकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील मातोरी परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. वर्दीतील एका जबाबदार अधिकाऱ्यावर एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    नेमका आरोप काय?

    दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पवन निंबाळकर नावाच्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचा मातोरी येथील एका तरुणीसोबत विवाह निश्चित झाला होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मोठ्या थाटामाटात साखरपुडाही पार पडला. लग्नाची तारीख जवळ आल्यानं मुलीच्या वडिलांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी या लग्नासाठी पणाला लावून लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती. सोनं-नाणं, कपडेलत्ते आणि लग्नकार्याचं साहित्य यांची खरेदी करण्यात आली होती. घरामध्ये नातेवाईकांची लगबग सुरू होती आणि लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. परंतु, लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, नवरदेव पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर याने अचानक लग्नास नकार दिला. या अनपेक्षित नकारानं मुलीच्या कुटुंबावर आभाळच कोसळलं. त्यांना मोठा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक धक्का बसला आहे.
    Maharashtra TimesNanded MLC Seat : विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचं नाव चर्चेत, वर्षानुवर्षे झटणाऱ्या ‘निष्ठावंतांना’ डावलणार!

    बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

    पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पवन निंबाळकर याने बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही पै-पै साठवून मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आणि लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले. समाजात आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, ऐनवेळी लग्नास नकार देऊन आमचा पैसा, अब्रू आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. जेव्हा आम्ही याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला शासकीय बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली’, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

    चकलांबा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

    या हायप्रोफाइल प्रकरणानंतर चकलांबा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी पवन निंबाळकर याच्याविरुद्ध फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूंकडून अत्यंत गंभीर आणि परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे चकलांबा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सुरू केली आहे. एका बाजूला मुलीच्या आयुष्याचा आणि फसवणुकीचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील अधिकाऱ्याची प्रतिष्ठा आणि दोन्ही बाजूंचे दावे आहेत. या प्रकरणातील नेमकं सत्य काय आहे? हे पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येईल.
    Maharashtra TimesNashik News : धरणात उतरणं पडलं महागात, पाण्याचा अंदाज न आल्यानं पती-पत्नीसह शेजारील दोन लेकरं बुडाली; आई-वडिलांचा मृत्यू चिमुकलीनं डोळ्यांनी पाहिला

    पीएसआयच्या (PSI) बाजूनेही मुलीच्या विरोधात तक्रार

    पीएसआय पवन निंबाळकर याच्या भावाने देखील चकलांबा पोलीस ठाण्यात उलट तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, संबंधित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी लग्नापूर्वी खरी माहिती लपवून त्यांची फसवणूक केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा