Liver Transplant: विविध संस्था पाठीशी उभ्या राहिल्याने या कुटुंबावर आर्थिक ताणही आला नाही. या मुलीला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.
मुंबईत अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलीचे यकृत प्रत्यारोपण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: लहान मुलांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आव्हानात्मक असते. मात्र बिहारहून आलेल्या एका नऊ महिन्यांच्या बाळावर मुंबईतील महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या सहकार्याने खासगी रुग्णालयामध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
सोना (नाव बदलले आहे) ही अवघ्या चार महिन्यांची असताना तिला बिलिअरी अट्रेशिया या गंभीर आजाराचे निदान झाले होते. या यकृतविकाराच्या प्रगत स्थितीमध्ये तिचे वजन ५.८ किलो होते. त्यासह पोर्टल व्हेन अट्रेशिया यांसारखी गंभीर वैद्यकीय गुंतागुंत होती. या मुलीचे पालक वैद्यकीय उपचारासाठी तिला मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये घेऊन येत. मात्र कावीळ आणि यकृतासंदर्भातील इतर गुंतागुंतींमुळे तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अनिल तांबे यांचे वैद्यकीय मत घेण्यात आले. डॉ. तांबे नायर रुग्णालयामध्ये मानद डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा देतात. या बालरुग्णाला यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे निदान झाले. बाळाच्या वडिलांनी यकृतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सुरू करण्यात आले.
नायर रुग्णालयामध्ये यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. प्रत्यारोपण समितीसह इतर वैद्यकीय प्रक्रिया या खासगी रुग्णालयांमध्ये पूर्ण करण्यात आल्या. या कुटुंबासमोर खर्चाचेही आव्हान होते. अनेक वैद्यकीय तसेच धर्मादाय संस्था या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कम उभ्या राहिल्या.
लहानगीची चिकाटी या लहानग्या जिवाने दाखवलेली चिकाटी आणि धैर्य पाहून रुग्णालयातील डॉक्टरांचेही डोळे पाणावले. शस्त्रक्रियेनंतरचा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. तिला ट्रॅकिओस्टॉमी (श्वासनलिकेला छेद देण्याची वैद्यकीय प्रक्रिया) करावी लागली. मात्र या प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद देऊन तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा