• Fri. Jun 5th, 2026

    Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत

    Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत

    महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं आणि 10 दिवसांत काय मोठा निर्णय होणार? याबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ आज दिल्लीला गेलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ दिल्लीत बैठकीसाठी गेलं. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी, कांदा उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांच्याबाबत काय-काय चर्चा झाली, केंद्र सरकारकडून काय मागण्या मागण्यात आल्या आणि केंद्र सरकारने काय मागण्या मान्य केल्या? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने पुढच्या 10 दिवसांत काही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, ते निर्णय नेमके काय आहेत ते फडणवीसांनी सांगितलं आहे.

    ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यासाठी काय निर्णय?

    “केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणींबाबत एक बैठक होती. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील उपस्थित होते. साखरेच्या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक सकारात्मक चर्चा झाली. विशेषत: आम्ही जे मुद्दे उपस्थित केले, एमएसपी वाढवावा, इथेनॉलचा कोठा वाढवावा, वेल प्राईज सिस्टीम तयार करण्याबाबत, लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याबाबत आणि इंटरेस्ट सबमेन्शनचे पैसे देणे या प्रत्येक गोष्टीत अथिशय सकारात्मक निर्णय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    पुढच्या दहा दिवसांत निर्णय होणार?

    “एमएसपी वाढवणं गरजेचं आहे हे त्यांनी मान्य केलं. इथेनॉलचा कोठा हा मोठ्या प्रमाणात वाढण्याकरता दोन महिन्यात या संदर्भात निर्णय करण्याचं त्यांनी मान्य केलं. इंटरेस्ट सबमेन्शनचे पैसे तात्काळ देण्याचं त्यांनी मान्य केलं. लोन रिस्ट्रक्चरिंगबाबत राज्य सरकारसोबत काम करुन प्रश्न मार्ग लावण्याचं आश्वासन दिलं. प्रायजिंग संदर्भात त्यांनी प्रस्ताव मागवला आहे. तो प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत. तो प्रस्ताव मान्य झाल्यास साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्तदेखील काही मुद्दे आमच्या सदस्यांनी मांडले. त्यावर एक निवेदन त्यांनी मागवले आहे. पुढच्या दहा दिवसांत निर्णय घेण्याचं अमित शाह यांनी मान्य केले आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो”, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय झाला?

    “कांद्याच्याबाबत विशेषत: आमच्या मुख्य मागण्या होत्या, नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरु केली आहे ती बाजारामध्ये झाली पाहिजे. ती खरेदी व्यापाऱ्याकडून नाही तर शेतकऱ्याकडून केली पाहिजे. त्याला मान्यता मिळालेली आहे. आम्ही दुसरी मागणी केली आहे की, दोन लाख टन ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

    “यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहण्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. विशेषत: आज आपल्याकडे कांद्याचे जे बियाणं आहे ते मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायला लागलं आहे. त्यामुले कांदे निर्यात करायला मार्केट मिळत नाही. त्यामुळे बियाणांवर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट चार्ज लावयला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ती मागणीदेखील त्यांनी मान्य केली आहे”, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    “कांदा साठवणूक आणि इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. कांद्याचा खरेदीचा भाव 15 रुपये 80 पैसे करण्यात आला आहे. तो आणखी वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कांद्याच्या खरेदीबाबत अडचणी होत्या, ग्रिडींगमध्ये माल निकृष्ठ दर्जाचा सांगून खरेदी नाकारली जाते. त्याबाबत शिवराजसिंह यांनी सांगितलं की, यंत्रसामग्रीच्या माध्यमातून ग्रिडींग करु, जेणेकरुन शेतकऱ्याला न्याय मिळेल. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. ती घालण्यात येणार नाही”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

    आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय चर्चा?

    “केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांना आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर मी निवेदन दिलं आहे. आंबा आणि हापूस आंबा यांच्याबाबत जो प्रश्न निर्माण झाला आहे, राज्य सरकार मदत करत आहेच, पण विमा कंपन्यांनी अटींमध्ये बदल केला तर आंबा उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते. ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर विमा कंपनीसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्नासन त्यांनी दिलं आहे”, अशी माहिती फडणीसांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा