• Thu. Sep 3rd, 2026

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 27, 2026
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर – महासंवाद

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ मे रोजी सोडत सभागृह उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय टी ब्लॉक, पहिला मजला, दाणा बाजार, एपीएमसी मार्केट, सेक्टर १९-बी, वाशी, नवी मुंबई-४००७०५ या ठिकाणी ‘महाराष्ट्र दिन भव्यतम सोडत’ काढण्यात आली.

या सोडतीमधून जनतेच्या ‘सर्वांगीण आर्थिक विकासासाठी’ या ब्रीद वाक्याचा अवलंब करण्यात आला. या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले (सामायिक) बक्षीस तिकीट क्रमांक एमडी-07/5273 रूपये २७,००,०००/- चे प्रिन्स लॉटरी सेंटर अॅन्ड जनरल स्टोअर्स, कल्याण व प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम
रू. ९०००/- ची ६ बक्षिसे लागली आहेत. रक्कम रू. १०,०००/- ची ४५ बक्षिसे व रू. १००००/-च्या आतील रकमेची २४५५ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रु.४६,७९,५००/-इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम
रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी कळवले आहे.

000

वंदना थोरात/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed