म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून विवाहित प्रेयसीने तिच्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पेठरोडवरील नवनाथनगर भागात सोमवारी मध्यरात्री घटना घडली.
अमोल दांडगे केल्याची पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी महिलेस ताब्यात घेतले असून, या हत्याकांडात आणखी दोन महिलांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अमोल पंढरीनाथ दांडगे (वय २६, रा. हनुमानवाडी, पंचवटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित महिला सोनाली राजेंद्र गायकवाड (३६, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत अमोल हा अविवाहित होता, तर संशयित आरोपी सोनाली विवाहित आहे. या दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते, त्याला अमोलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारून अमोल पंधरा दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील घर सोडून पेठरोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत ‘लिव्ह-इन’ मध्ये राहण्यास आला होता.
..या वादामुळे कृत्य सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, वो मध्यरात्री एकच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात पैशाच्या न देवाणघेवाणीवरून आणि अनैतिक संबंधांवरून जोरदार वाद झाला. हा , वाद इतका विकोपाला गेला, की रागाच्या भरात संशयित सोनालीने अज्ञात वस्तूच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळला. त्यात अमोलचा, गुदमरून मृत्यू झाला.
.. असा झाला उलगडा अमोल निपचित पडल्यानंतर सोनालीने घाबरून शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने डॉक्टरांना ‘अमोल चक्कर येऊन पडला,’ असे सांगत बनाव रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासणीदरम्यान अमोलच्या गळ्यावरील काळे व्रण पाहून डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. अखेर शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळल्यानेच झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सोनालीचा बनाव खोडून काढत तिला ताब्यात घेतले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा