Pune Crime : मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमधील ‘गॉड’ नावाच्या क्रमांकाशी झालेल्या चॅटमुळे संशय निर्माण झाला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या ‘व्हॉट्सअॅप अकाउंट’चा वापर करणाऱ्या तेजस हर्षदकुमार शहा या तरुणाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी अटक केली. त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न हाताने लिहून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) विषयतज्ज्ञ मनीषा हवालदार हिच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीबीआयच्या पुण्यातील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी शहाला दोन दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावली.
पतीच्या मोबाइलमधील ‘गॉड’ नावे नंबर
तपासात मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाइलमधील ‘गॉड’ नावाच्या क्रमांकाशी झालेल्या चॅटमुळे संशय निर्माण झाला होता. सीबीआयने सदाशिव पेठेतील त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले. तपासादरम्यान हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे यांच्यासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचाही संशय आहे. UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्याला 125 कोटींच्या हुंड्याची ऑफर, माजी लष्करी अधिकाऱ्याचा खुलासा, खोट्या प्रतिष्ठेवरुन संताप
भौतिकशास्त्राचे हस्तलिखित स्वरूपातील प्रश्न
पथकाने हवालदारच्या सदाशिव पेठ भागातील घरावर टाकलेल्या छाप्यावेळी तिच्यासह पतीचा मोबाइल जप्त केला. या मोबाइलच्या तांत्रिक तपासात ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या मोबाइल क्रमांकासोबतचे चॅटिंग आढळले. या चॅटिंगमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे हस्तलिखित स्वरूपातील प्रश्न आढळून आले. हा क्रमांक तेजस शहा याचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय)च्या पथकाने त्याची चौकशी केली.
Pune Curfew | पुणे १४ दिवसांसाठी रात्री बंद, पुण्यात नेमकं घडतंय काय? पाहा संपूर्ण व्हिडीओ
त्या वेळी मनीषा हवालदारने तेजसला भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न हस्तलिखित स्वरूपात पतीच्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर तेजसने संबंधित कागदपत्रे नष्ट केल्याचे उघडकीस आले.
तेजस शहाची भूमिका समजणार
या हस्तलिखित स्वरूपातील प्रश्नपत्रिकेतील बहुतांश प्रश्न यंदाच्या परीक्षेत आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तेजस शहाला अटक करून मंगळवारी रात्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रश्न लिहून देण्यापलीकडे तेजस शहाची या संपूर्ण रॅकेटमध्ये नेमकी काय भूमिका होती, इतर आरोपींशी त्याचे आर्थिक किंवा तांत्रिक व्यवहार झाले होते का, याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) सुरू आहे. Bharat Gogawale : गोगावले-तटकरे वादावर अखेर तोडगा; रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, भरतशेठ यांना काय मिळणार? गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला प्रवासी कोठडी देण्याची विनंती ‘सीबीआय’चे तपास अधिकारी आणि सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा