अग्रेको कंपनी पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारणार असून, त्याचे काम याच वर्षी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, स्कॉटलंडबाहेर उभारले जाणारे हे ‘अग्रेको’चे जगातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे केंद्र असणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे; तसेच अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रीसिजन इंजिनीअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे.
Bandu Andekar: बंडू आंदेकर तुरुंगातून सूत्र हलवतोय? तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर; पोलिसांकडून अखेर कठोर पाऊल
पुणे येथील प्रकल्पासाठी सरकारकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे.
या कराराद्वारे कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाईल, तसेच विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
Pune MLC Election: पुण्यात विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘गणिता’ला राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर; संख्याबळाचा आकडाच सांगितला!
‘आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल’
मुंबई : मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी असून १२ वर्षांच्या काळात आत्मनिर्भर भारत म्हणून आपला देश जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पाहावयास मिळत आहे,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
पुणे आता ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) एक महत्त्वाचे बनत असून या जीसीसी राजधानीत अग्रेको कंपनीचे स्वागत आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळेल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
