Pune NEET Paper Leak Manisha Hawaldar : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉडफादर नंबर कुणाचा आहे? ते आता समोर आलंय.
मनीषा हवालदार मोबाईल गॉड नंबर सेव्ह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : ‘नीट-यूजी 2026’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाला आता ‘गॉड’ नावाच्या व्हॉट्सअॅप अकाउंटमुळे नवं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचं संशयास्पद चॅट केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आढळून आलं होतं. प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण? याची माहिती आता समोर आली आहे. संशयास्पद क्रमांक तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट
तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलिट केल्याची कबुली दिली; तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचेही तिने मान्य केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले असून, अन्य काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. Pune Crime: पुण्यात आयटीमधील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराला अटक; प्रेमसंबंधांतील वादानंतर निकितासोबत काय घडलं?
पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ नावाने नंबर सेव्ह
मनीषा हवालदार हिची चौकशी करताना पती संजय हवालदार हिच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या मोबाइल क्रमांकाशी झालेला संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्यानंतर ‘सेलेब्राइट प्रीमियम’ या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाइलचे डिजिटल एक्स्ट्रॅक्शन करण्यात आले. डिलिट करण्यात आलेल्या चॅटमधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली होती. आता तो नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. NEET Paper Leak: मनीषा हवालदारच्या CBI चौकशीत धक्कादायक खुलासे; पुण्यातील आणखी एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचं नाव घेतलं, व्याप्ती वाढली!
लेखी पुरावेच नव्हे, तर…
चौकशीची चाहूल लागताच आरोपी मनीषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तिने स्वतः तयार केलेल्या फिजिक्स विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून खाक केल्या, जेणेकरून तपास यंत्रणांच्या हाती कोणताही लेखी पुरावा लागू नये. फक्त लेखी पुरावेच नव्हे, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी तिने सहआरोपी आणि बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेस डिलीट केले होते. मनीषा हवालदार हिने स्वतःच्या मोबाईलसोबतच पतीच्या मोबाईलचा वापर करूनही मनीषा मांढरेला प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा