• Sat. Jun 6th, 2026
    New Nagpur: नवीन नागपूरसाठी भूसंपादन सुरू; शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप, ७८ एकर जमीन प्राप्त

    New Nagpur Land Acquisition: नवीन नागपूर शहराच्या भूसंपादनाचा खर्य 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी एकूण 629 हेक्टरजमीन लागणार असून यापैकी 456 हेक्टर लाडगावमध्ये आहेत तर 173 गोधणीमध्ये आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूरच्या विकासाला बळ देणाऱ्या नवीन नागपूरच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून आतापर्यंत १९ रजिस्ट्री करण्यात आल्या. ७८ एकर जमीन प्राप्त झाली असून शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले.

    हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगाव (रिठी) या गावांत नवीन नागपूर वसविले जात आहे. नवीन नागपूरसाठी ६९२ हेक्टर आर जागा संपादित करायची आहे. यापैकी १२ हेक्टर जमीन शासनाचीच असल्याने त्याचा प्रश्नच नाही. मात्र उर्वरित जमीन मिळावी यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले. गोधनी गावातील १९ लाभार्थ्यांना मोबदला देण्यात आला.

    Maharashtra TimesPurandar International Airport: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग; 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

    आज, सोमवारपासून येथील लाडगाव शेतकऱ्यांची रजिस्ट्री करण्यात येणार आहे, असे एनएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी प्रियदर्शनी बोरकर यांनी सांगितले. नागपूरच्या
    विकासात मोलाची भर टाकणाऱ्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन बोरकर यांनी केले. नवीन नागपूर प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूकदरांना परवानगी घेणे सोपे व्हावे यासाठी एक खिडकी योजना (सिंगल विंडो क्लिअरन्ससाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म) सुरू होणार असल्याने नवीन नागपूरच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही एनएमआरडीएने व्यक्त केला.

    Maharashtra TimesBullet Train: पारसिक डोंगराखाली बुलेट ट्रेनचा बोगदा; कटरहेड घणसोली शाफ्टमध्ये दाखल, ‘अंडरग्राऊंड टनल’चा मार्ग कसा असेल ?

    गुंतवणुकीसाठी उद्योजकांकडून विचारणा

    पुढील १५ वर्षांत तीन टप्प्यात नवे नागपूर विकसित करण्याचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठीचा एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. नवीन नागपूर आणि रिंगरोडसाठी हुडकोकडून ७ हजार ८०० कोटी रुपये कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे बघीतले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाने ६ हजार ५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला ३ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. नवीन नागपूरचा प्रकल्प स्टार्ट अप्स, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग, आयटी कंपन्या, व्यावसायिक कार्यालयांसाठी केंद्र, मिश्र वापर विकासावर भर देणारा राहणार आहे. आता गुंतवणुकीसाठी चार उद्योजकांकडून विचारणा झाली असल्याचे एनएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा