• Sat. Jun 6th, 2026

    Nida Khan : ‘हानिया जो कन्व्हर्ट हुई…’; निदा खानने नातेवाईकाला मराठी तरुणीबद्दल काय सांगितलं? महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती

    Nida Khan : ‘हानिया जो कन्व्हर्ट हुई…’; निदा खानने नातेवाईकाला मराठी तरुणीबद्दल काय सांगितलं? महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती

    Nashik Conversion Case: निदा खानचे महत्त्वाचे ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती लागले असून तिच्या जामीन अर्जावर आज नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.

    निदा खान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘आज हानिया के साथ बाहर जा रहीं हूँ…’, ‘हानिया कौन हैं…’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई…’ या स्वरुपाचे ‘चॅटिंग’ संशयित निदा एजाज खान हिने तिच्या नातलगासोबत केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या तपासात स्पष्ट झाली असून, त्यातून महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २५) नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार असून, धर्मांतराच्या खटल्यातील पहिली सुनावणीदेखील पार पडणार आहे.

    बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कार आणि तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नाचा खटला आता नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या पटलावर आला आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) पंधराशे पानांचे दोषारोप पत्र दाखल करताच न्यायालयाने सुनावणीबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार खटल्याची पहिली सुनावणी आज, सोमवारी (दि. २५) होणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत २६ मार्च रोजी अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या तीन संशयितांविरुद्ध बलात्कारासह धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात निदा पसार असताना तिला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरातील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल यालादेखील गुन्ह्यात सहसंशयित केले आहे. त्यालादेखील नाशिक पोलिसांनी नोटीस बजावून आज, सोमवारी समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

    दरम्यान, संशयितांच्या कटानुसार पीडितेचे वर्तन सुरू झाल्यावर ती अत्यानंदित झाल्याने तिचे नाव ‘हानिया’ केले होते. पीडितेचे मूळ नाव हे तिच्या धर्मानुसार महत्त्वाचे होते. त्यामुळेही नामकरणाचा डाव संशयितांनी आखला होता. त्यावरून निदाचे तिच्या पतीसमवेत झालेले ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती लागले आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘एसआयटी’ नियुक्त करून सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा