• Sat. Jun 6th, 2026

    स्थानकावरून सुटताच लोकल ट्रेन बंद पडली; मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा, कसारा-कल्याण मार्गावर सेवा ठप्प

    स्थानकावरून सुटताच लोकल ट्रेन बंद पडली; मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा, कसारा-कल्याण मार्गावर सेवा ठप्प

    मुंबई: रविवारी सकाळी लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांच मोठा खोळंबा झाला. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा पहाटेच्या सुमारास विस्कळीत झाली. त्यामुळे तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा बंद होती. रविवारी मेगा ब्लॉकमुळे आधीच अनेक लोकल रद्द झालेल्या असतात. त्यात ऐन वेळी लोकल खोळंबल्याने सकाळी घराबाहेर पडलेल्यांचे मोठे हाल झाले.

    कल्याण-कसारा मार्गावर सेवा ठप्पा

    रविवारी, मध्य रेल्वेवर काही दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान, कसारा-कल्याण मार्गावरील सेवेवर परिणाम झाला. आसनगाव ते खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ठप्प झाली. मध्य रेल्वेच्या अप लाइनवरील वीज पुरवठा बंद पडल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली. वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे सकाळी एक ते दीड तासांसाठी लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

    Konkan Railway: कोकणवासियांचा परतीचा प्रवासही त्रासाचा; गाड्या दादर-ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार, कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?

    रविवारी पहाटे 4.30च्या सुमारस निघालेली पहिली लोकल 4.45 वाजता ठप्प झाली. त्यानंतर 5.30 वाजून गेल्यानंतरही बराच वेळ रेल्वे सेवा ठप्प होती. त्यामुळे पहाटे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला आहे.

    दरम्यान, रविवारी दिवसभर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे या दरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते विरारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे या मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळ आणि सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    मध्य रेल्वे

    स्थानक : माटुंगा ते मुलुंड
    मार्ग : अप आणि डाउन धीमा
    वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
    परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    Maharashtra TimesMega Block News : येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ तीन स्थानकांवर थांबणार नाही ट्रेन

    हार्बर रेल्वे

    स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
    मार्ग : अप आणि डाउन
    वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
    परिणाम : सीएसएमटीहून वाशी/बेलापूर आणि पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed