नागपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार पुढील दहा महिन्यांत कोसळेल, असा दावा काँग्रेसच्या बैठकीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नागपुरात आयोजित गोदाम लॉजिस्टिक पार्कचा शुभारंभ कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधी यांना टोला लगावत म्हणाले की, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने ही मालिका यायची, राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून त्याचाच प्रत्यय येतो.’
दरम्यान, नागपुरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर भर दिला. नागपूर आता देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर एक लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येत आहे. आज गोदाम लॉजिस्टिक पार्क याचा उद्घाटन केलेला आहे. अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे. शंभर एकरहून जास्त जागेवर हे काम करण्यात आलेलं आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, लॉजिस्टिकमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठा फायदा हा नागपूरला होणार आहे. गेल्या काही काळात जी लॉजिस्टिक पॉलिसी तयार केली आहे, त्याच्यामुळे नागपूर हे देशातला एक मोठे लॉजिस्टिक हब होत आहे. मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क तयार होत आहे आणि यामुळे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी होणार आहे. आपल्याला जर ग्लोबल सप्लाय चैनचा भाग व्हायचा असेल, तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणे हे महत्त्वाचं आहे आणि तेच काम आज या माध्यमातून करत आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, “आता काम वेगाने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते अतिशय वेगाने काम झालेलं आहे. विशेषता समृद्धीचं एक्सटेन्शन आहे, यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातून लॉजिस्टिकची कॉस्ट अतिशय कमी होईल. तसंच रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, लॉजिस्टिक पार्कमध्ये सर्वात मोठा रोजगार असतो, त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा