Ratnagiri News: दरवाजा वाजवल्यानंतर प्रतिसाद न दिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा पंकज टेबलावर निपचित अवस्थेमध्ये पडलेला दिसून आला.
मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी: अलीकडे युवकांमध्येही हृदयविकारासह विविध आजारांचं प्रमाण वाढत असून अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात गोळकोट येथे घडली आहे. मुंबईहून गावी आलेल्या तीस वर्षीय युवकाचा आकस्मित मृत्यू झाला आहे. पंकज नथुराम कदम (वय-३० वर्ष रा. गोवळकोट ढवळनाका चिपळूण ता. चिपळूण जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या पंकज याचा भाऊ राकेश कदम हाही मुंबई येथून गावी आला होता. राकेश हा सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त रत्नागिरीतील गावी आला होता. पंकज दुपारपासून घराच्या बाहेर पडला नव्हता. त्यामुळे राकेश याने पंकजला हाक मारली. मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये पाहिलं असता पंकज हा टेबलावर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे सगळेच घाबरले होते. नेमकं काय झालं हे कोणाला कळत नव्हतं. अखेर पंकजला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पंकज काहीही बोलत नव्हता. त्याची हालचालही होत नव्हती. त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिक्षाने तात्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कामथे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
पंकज हा सुद्धा मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होता. मात्र तो अलीकडेच गावी आला होता. पंकज याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी व्हिसेरा तपासासाठी राखून ठेवला आहे. या प्रकरणाची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अविवाहित असलेल्या पंकज याच्या पक्षात तीन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास चिपळूणचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा