• Sat. Jun 6th, 2026

    मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

    मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

    मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी मुश्रीफांची भूमिका आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नुकतंच जाहीर केलं. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल काय असेल, याबाबतची रणनीती सांगण्यात आली. शरद पवार यांच्याकडून सक्षम विरोधी पक्ष म्हणून राज्यात उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीतील ही माहिती स्वत: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. याचवेळी शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याचा किंवा विलीनीकरणाचा विषय संपला आहे, असं स्पष्ट केलं. पण यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं,अशी हसन मुश्रीफ यांची इच्छा आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही अजित पवार हयात असतानादेखील होती. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली देखील बघायला मिळाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष पेटलेला बघायला मिळाला. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठका पार पडल्या. एकीकडे या सर्व घटना सुरु असताना अचानक अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजित पवार यांच्या निधननंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी अजित पवारांची शेवटची इच्छा होती, अशी भूमिका मांडली. पण पुढे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी पार पडला आणि त्यांच्या पक्षाने विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या.

    असं असलं तरी वारंवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण येत असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. पण सुनील तटकरे आणि शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घडून आली. त्यामुळे पुन्हा याबाबत विविध चर्चांना उधाण आलं. अखेर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्ट केलं. दुसरीकडे शरद पवार यांनीदेखील तटकरे आणि पटेल यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना, कोणत्या नेत्याकडून कसं काम करुन घ्यावं हे पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. या घडामोडी ताज्या असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी विलीनीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला शशिकांत शिंदे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे.

    हसन मुश्रीफ काय म्हणाले?

    “मी शरद पवार यांची दोन्ही वक्तव्ये बघितले. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर जाणं आणि देशाची इभ्रत वाढण्याबाबतचं जे वक्तव्य केलं आहे ते महत्त्वपूर्ण आहे. मला वाटतं शरद पवार यांचं ते वक्तव्य योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जावून जे काम करत आहेत, ते देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी काम करत आहेत. शरद पवारांनी मोदींच्या या कतृत्वाचं कौतुक केलं त्याबद्दल मी आभारी आहे. पण विलीनीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणारी मंडळी ही विलीनीकरण होणार नाही, असं म्हणत असल्याचं माहिती पडल्यावर आम्ही सुद्धा आचंबित झालेलो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात प्रश्न आहे की, असे प्रश्न कसे होऊ शकतात? कारण विलीनीकरणाबाबत ते सातत्याने प्रयत्न करत होते. मग अचानक त्यांनी हा निर्णय का घेतला? मी मुंबईला गेल्यानंतर याबाबत सविस्तरपणे माहिती घेईन”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

    शशिकांत शिंदे काय म्हणाले?

    “मी विलीनीकरणाबाबत त्या दिवशी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, हा विषय आता संपलेला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी असं वक्तव्य केलं, त्याचेच मला आश्चर्य वाटत आहे. मला वाटतं की, आम्ही ही भूमिका का घेतली? बात निकली तो बहुत दूर तक जाएगी. त्यामुळे हा विषय मी आहे तिथेच थांबवतो”, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा