• Mon. Sep 14th, 2026

दौंड-मनमाड दुहेरीकरणामुळे प्रवाशांची गैरसोय, सोलापूर मार्गावरील एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडलं, दररोज 3-6 तास विलंब

दौंड-मनमाड दुहेरीकरणामुळे प्रवाशांची गैरसोय, सोलापूर मार्गावरील एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडलं, दररोज 3-6 तास विलंब

Daund-Manmad Railway Doubling: दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे प्रवास सुलभ होणार असला तरी सध्या सोलापूर विभागातील प्रवाशांचे दररोज हाल होत आहेत

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर: पुणे रेल्वे विभागावर दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. यामुळे पुणे आणि नाशिकदरम्यान कनेकटीव्हीटी सुधारणार असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, या कामांसाठी सोलापूर मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला आहे. अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले असून काही गाड्यांचं वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक एक्सप्रेस ट्रेन या कामांमुळे तासंतास उशिराने धावत आहेत.

काही एक्सप्रेस वळवल्या

248 किलोमीटर लांब दौंड-मनमाड रेल्वे लाइनचं दुहेरीकरण करण्यात येत आहे. मनमाड स्थानक एक महत्त्वाचं जंक्शन असल्यामुळे या कामांमुळे प्रवास सहज आणि वेगवान होणार आहे. या मार्गावरील नगर-दौंड भागाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. दौंड-काश्ती 13 किलोमीटर लांब रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं असून काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील चाचणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मार्गावरील काम सध्या सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर रोड, कुर्डूवाडी, सोलापूर या मार्गावर ट्रेन वळवल्या आहेत.

Maharashtra TimesPune Metro: ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

सोलापूर मार्गावरील हुतात्मा एक्सप्रेस , हरंगुळ-हडपसर आणि इतर अनेक गाड्यांचं वेळापत्रक विस्कळित झालं आहे. या गाड्या तासंतास उशीराने धावत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ऐनवेळी ट्रेनऐवजी इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवासात वेळ वाढत असूनच खिशालाही झळ बसत आहे. पुणे-सोलापूर मार्गावरील हुतात्मा एक्सप्रेस गेले तीन दिवस रोज विलंबाने धावत आहे. दोन्ही मार्गांवरील ट्रेन तब्बल तीन तास उशीराने धावत होती. या ट्रेनने विद्यार्थी आणि व्यावसायिक दररोज प्रवास करतात. त्यामुळे या सर्व प्रवाशांची गैरसोय होत आहे.

लिंक रेकमुळे अनेक गाड्या उशीराने धावतात

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील कामांमुळे एकाच ट्रेनला विलंब होत नसून त्यामुळे पुढील सर्व गाड्यांनाही विलंब होत आहे. या मार्गावरील ट्रेन लिंक रेक प्रमाणे धावतात. त्यामुळे एका ट्रेनच्या वेळापत्रकाचे इतर सर्व ट्रेनवर सुद्धा परिणाम होतो. एका फेरीमध्ये उशीर झाला की पुढील फेरीचं वेळापत्रकसुद्धा कोलमडतं. त्यामुळे गेले काही दिवस सोलापूर विभागातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यां उशीराने धावत असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

Maharashtra TimesBandra Terminus Metro: ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

याशिवाय, हरंगुळ-हडपसर एक्सप्रेससुद्धा विलंबाने धावत आहे. कुर्डूवाडी स्थानकावर सायंकाळी 5.20 वाजता दाखल होणारी ही गाड 1-2 नव्हे तर तब्बल सहा तास उशीराने दाखल होते. कुर्डुवाडीत रात्री उशीरा गाडी पोहोचत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, हुबळी-बनारस एक्सप्रेस सोलापू-कुर्डूवाडी-लातूर रोड-छत्रपती संभाजीनगर-मनमाड या मार्गावर वळवली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा