• Sat. Sep 19th, 2026

Crime News : उपचारासाठी रुग्णालयात गेली, दोघांनी तिला धमकावत दुसरीकडे नेलं, अतिप्रसंगाचा प्रयत्न, धाडसी तरुणीने स्वत:ला वाचवलं, आरोपींना सिनेस्टाईल बेड्या

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी हॉस्पिटल परिसरात उपचारासाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही नराधमांना बेगमपुरा पोलिसांनी 24 तासांच्या आत गजाआड केले आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत आरोपीच्या हाताचा कडाडून चावा घेतल्यामुळे नराधमाचा डाव उधळला गेला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रोहन जगदिश रिडलॉन (वय २४, रा. मुंबई), विशाल प्रकाश चावरिया (रा. घाटी क्वार्टर्स, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, वैजापूरची मूळ रहिवासी आहे.

Maharashtra TimesDisha Salian Case : मातोश्रीच्या उंबरठ्यावर अब्रुनुकसानीची नोटीस, ठाकरेंना घरी जावूनच नोटीस का दिली? सतीश सालियन यांचे धमकीचे आरोप२० वर्षीय तरुणी १८ सप्टेंबर रोजी रात्री रिक्षाने जात असताना अचानक ब्रेक लागल्याने तिच्या उजव्या डोळ्याला रिक्षाच्या मीटरचा मार बसला होता. डोळ्याचा त्रास वाढल्याने १९ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ती घाटी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी डोळे तपासल्यानंतर तिला पुढील तपासणीसाठी वॉर्ड क्र. १५ आणि नंतर वॉर्ड क्र. ११ मध्ये जाण्यास सांगितले.

तरुणी वॉर्ड क्र. ११ कडे जात असताना, सोबत असलेल्या विशाल चावरिया आणि रोहन रिडलॉन यांनी तिला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने SSB बिल्डिंगजवळ आणले. तिथे वॉचमनसमोरच तिला हाताच्यापटाने मारहाण करत आणि धमकी देऊन बळजबरीने स्कुटीवर बसवले. त्यानंतर तिला एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले.

Maharashtra TimesAdvocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती

​तरुणीने प्रतिकार करत घेतला कडाडून चावा

टेरेसवर गेल्यावर विशाल चावरिया खाली थांबला, तर रोहन रिडलॉन याने तरुणीला पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली आणि रोहनच्या हाताचा कडाडून चावा घेतला. अचानक झालेल्या या आक्रमक प्रतिकाराने घाबरलेल्या आरोपीने तिला सोडले आणि ती कशीबशी जीव वाचवून पळाली. यानंतर तिने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली.

​जनशताब्दीने मुंबईला पळण्यापूर्वी जालन्यातून आवळल्या मुसक्या

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड, पोलीस अंमलदार उमेश ठाकूर, उमेश चव्हाण आणि संदीप सोर यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पथकाने जुबली पार्क परिसरात लपून बसलेल्या विशाल चावरियाला तात्काळ ताब्यात घेतले.

Maharashtra TimesNandurbar Crime : 5 लाखांची सुपारी घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न, नंदुरबारातलं चक्रावून टाकणारं प्रकरण​दुसरीकडे, मुख्य आरोपी रोहन रिडलॉन हा मुंबईचा रहिवासी असल्याने तो पोलिसांना चकवा देऊन जालना रेल्वे स्थानकावरून ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ने मुंबईला पसार होण्याच्या बेतात होता. तो जालन्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर उतरून रेल्वे स्टेशनकडे जात असतानाच बेगमपुरा पोलिसांच्या पथकाने त्याला बस स्थानकातच अटक केली.