• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Crime: नाशिकमध्ये मोठा दरोडा, लाखो रुपये कॅश आणि तब्बल १५ तोळे सोने लंपास, CCTV मध्ये काय दिसलं?

    Nashik Crime: नाशिकमध्ये मोठा दरोडा, लाखो रुपये कॅश आणि तब्बल १५ तोळे सोने लंपास, CCTV मध्ये काय दिसलं?

    Nashik Robbery: दोन चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधली आणि दरवाजा तोडत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास केले.

    नाशिकमध्ये मोठा दरोडा, लाखो रुपये कॅश आणि तब्बल १५ तोळे सोने लंपास(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यातच नाशिकच्या सुचिता नगर परिसरात चोरट्यांनी एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकून लाखो रुपये आणि १५ तोळे सोने चोरून नेले आहेत. याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV च्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

    नाशिक येथील सुचिता नगर इथल्या दिलांश अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १ येथे पहाटेच्या ५:३० वाजेच्या सुमारास दोन जणांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात प्रवेश करून दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडला आणि घरातील मुद्देमाल लंपास केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक इंद्रपाल सिंह हे आपल्या परिवारासोबत बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे २५ लाख रुपयांची रोकड आणि अंदाजे १५ तोळे सोने लंपास केले आहे. घरमालकांनी सकाळच्या सुमारास मोबाईलवरून CCTV तपासले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घरात जाऊन पाहणी करण्यास सांगितले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मात्र तोपर्यंत चोरटे लाखोंची रोकड आणि १५ तोळे सोने घेऊन फसार झाले होते. दरोड्याच्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    दरम्यान, या प्रकरणी माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तसंच परिसरात असलेल्या CCTV च्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

    बनावट लग्न लाऊन लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला टोळीला अटक

    नाशिकमध्ये तरुणांना लक्ष्य करून त्यांचे बनावट लग्न लाऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयित महिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ३० मार्च रोजी मुंबई नाका पोलिस ठाणे येथे पीडित बळवंत साहेबराव पाटील (रा.वायपूर,शिंदखेडा,धुळे)यांनी फिर्याद दिली. या प्रकरणातील ४ महिलांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहे. अटक केलेल्या संशयित महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा