Garib Nagar: वांद्र्यातील गरीब नगर येथील 5300 चौरस मीटर जागा येत्या 23 मेपर्यंत रिकामी करण्याचं पश्चिम रेल्वेचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर या जागेभोवती कुंपण घालून विस्तार करण्यात येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: वांद्रे पूर्वेकडे गरीबनगरमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम पश्चिम रेल्वेने हाती घेतली आहे. आज या पाडकामाचा तिसरा दिवस असून, दुसऱ्या दिवसाअखेर 60 टक्के काम पूर्ण झालं होतं. यावेळी अनाधिकृतपणे राहणाऱ्या हजारो नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. काही काळ तणावपूर्व स्थितीही निर्माण झाली होती आणि पोलिसांना ही परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. पण हे अतिक्रमणे गेल्या अनेक वर्षांत अनेक वेळा हटवण्यात आले आहेत. पण रेल्वेची जागा रिकामी राहिली की पुन्हा हे स्थानिक येथे वास्तव करतात. पण यावेळी पश्चिम रेल्वे वांद्रे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार आहे.
5300 चौरस मीटर जागा
ही कारवाई पूर्ण होताच सर्व प्रथम गरिबनगर येथील सुमारे 5300 चौरस मीटर जागेभोवती कुंपण घालण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या काही वर्षांत वांद्रे टर्मिनसचा पूर्वेकडे विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर फलटांची संख्या वाढवण्यासह इतर पायाभूत सुविधांचाही विस्तार केला जाणार आहे. 23 मेपर्यंत ही पाडकाम प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जमीन सुरक्षित करून सर्व प्रकल्पांच्या कामांना सुरूवात केली जाईल.Bandra Demolition Drive : वांद्र्यात गरिबनगरमध्ये राडा, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पोलिसांचा मोठा इशारा
सध्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून 22 मेल-एक्सप्रेस सुटतात. येत्या काही वर्षांत ही संख्या 50 टक्क्यांनी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून 50 नव्या मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर गरीबनगर येथील अतिक्रमण हटवण्यात यश मिळाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
कसा होणार विस्तार?
वांद्रे टर्मिनसच्या विकासासह पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारामध्येही या कारवाईने मोठा फायदो होणार. सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामाला वेग मिळणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरी मेल / एक्सप्रेस आणि लोकलची वाहतूक विभागून वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत होणार आहे. तसेच, नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पालाही मोठा फायदा होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच हे अनाधिकृत बांधकामं होती. त्यामुळे संकुलात उभारल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत कनेकटीव्हीटी मिळणार आहे.
Bandra East Demolition Drive : एक हजार कर्मचारी, १२ जेसीबी अन् गरीबनगरमधील ४०० झोपड्या जमीनदोस्त
या मोहिमेत सुमारे 400हून अधिक बांधकामे पाडण्यात येत आहे. 10 आणि 11 ऑगस्ट 2021 रोजी केलेल्या बेसलाइन नोंदीनुसार सर्व स्थानिकांपैकी केवळ 100 रहिवासी पुनर्वसनासाठी पात्र आहेत. हे रहिवासी अधिकृतपणे वास्तव्य करत असून यांना यापूर्वीच राज्य सरकारने पर्यायी निवासस्थान प्रदान केले असून काहींना देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतर सर्व रहिवाशांना बेकायदा घोषित केले असले तरी ते गेली चार दशकं या ठिकाणी राहत आहे. निवडणुकीतही ते त्यांचा हक्क बजावत असून या कारवाईमुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा ते करत आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा