Pune 7 Yrs old Boy Dies After Stuck In Lift: सिंहगड रस्ता परिसरातील एका सोसायटीच्या लिफ्टच्या दोन दारांत अडकून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश इमारतीत खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. त्याने लिफ्टमधील बटणे दाबल्यावर लिफ्ट सुरू झाली. मात्र, दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वीच लिफ्ट अचानक अडकली. या वेळी तो लिफ्टच्या दोन्ही दरवाजांच्या मध्ये अडकल्याचे सांगितले जात आहे. बराच वेळ शिवांश न दिसल्याने सोसायटीतील रहिवाशांनी शोध सुरू केला. त्या वेळी तो लिफ्टमध्ये अडकल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
Pune crime: पुण्यात माणुसकी ओशाळली! प्रवासी भरण्याचा वाद विकोपाला, रिक्षाचालकाला बेदम मारलं, पुलावरुन फेकलं, तिघे ताब्यात
प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, नेमका प्रकार कसा घडला, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.
Pune News : पेपर फोडणाऱ्या वाटल्या नाहीत, दोन मनिषांबाबत शेजारी चकित; मांढरे पतीपासून विभक्त, आसपास कुजबूज; वाघमारेच्या नवऱ्याबद्दलही माहिती समोर
तर दुसऱ्या एका घटनेत, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे, तर घडलेली घटना दुर्दैवी असून, या प्रकरणाची रुग्णालय चौकशी करीत आहे. संबंधित कागदपत्रे आणि माहिती पोलिस; तसेच ससून रुग्णालय प्रशासनाला देण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
