Garib Nagar: पश्चिम रेल्वेने मुंबईत वांद्रे येथे अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतले असून, शहरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. पाच दिवसांच्या या मोहिमेत 400 घरं उध्वस्त होणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सुमारे पाच हजार २०० चौरस मीटर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम पश्चिम रेल्वेने मंगळवारपासून सुरू केले आहे. तब्बल नऊ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गरीब नगरमधील सुमारे ४०० झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी २० टक्के काम पूर्ण झाले आहे. २३ मेपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू राहणार आहे.
वांद्रे टर्मिनसचा विकास
भारतीय रेल्वेतील सर्वांत मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमांत या कारवाईचा समावेश असून यामुळे सुमारे ६०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन पश्चिम रेल्वेच्या पुन्हा ताब्यात येणार आहे. या ठिकाणी वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचे, तसेच ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’ उभारण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.Mumbai AC Local: मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेमार्गावर धावणार 238 नव्या एसी लोकल; पूर्वीपेक्षा वेगवान आणि आरामदायी ट्रेन, कधी होणार दाखल?
वांद्रे पूर्वेकडील अतिक्रमण हटवण्याची कारवाई अचानक किंवा मनमानी स्वरूपाची नाही. सार्वजनिक जागा कायद्यांतर्गत २०१७ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी बेदखलीचे आदेश जारी करण्यात आले. या प्रकरणी जवळपास नऊ वर्षे विविध न्यायालयांमध्ये सुनावणी पार पडली. यात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील कार्यवाहीचाही समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या आदेशांनुसार सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिल्यानुसार, अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचे योग्य पालन करून कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
गरीब नगरमधील ५०० झोपड्यांचे यापूर्वीच संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे. संयुक्त सर्वेक्षण प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १०० संरचनांचे संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण हटवताना पात्र ठरलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार नाही. ही कारवाई मुख्यतः रेल्वे रुळांलगतच्या सुरक्षा क्षेत्रात केली जात आहे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एक हजार कर्मचारी, १२ जेसीबी
वांद्रे पूर्वेतील गरीब नगर, बेहरामपाडा हा संवेदनशील परिसर मानला जातो. अतिक्रमण हटवण्याच्या यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पश्चिम रेल्वे , शहर पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल यांची विशेष बैठक पार पडली. सोमवार रात्रीपासून बंदोबस्त सुरू करण्यात आला. शहर पोलिसांचे ४०० अधिकारी-कर्मचारी, रेल्वे पोलिसांसह आरपीएफचे ४०० जवान आणि पश्चिम रेल्वेचे २०० कर्मचारी अशा एकूण एक हजार कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याच्या उपस्थितीत १२ जेसीबी, दोन पोकलेन, १२ ट्रक अशा साधनांसह तोडकाम सुरू झाले आहे.
Monsoon Update: मान्सूनची आगेकूच सुरूच; यंदा राज्यातही लवकर दाखल होणार, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’
‘वीजबिल, देयके भरूनही कारवाई’ पालिकेची
‘एकीकडे २७ मे रोजी असलेला ईदचा सण साजरा करण्याची तयारी सुरू असताना, रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ‘त्योहार मनाए या मातम’, अशी स्थिती आहे. आम्ही वीज बिलांसह महापालिकेची सर्व बिले वेळेवर देत होतो. घर अनधिकृत असल्यास त्याला अधिकृत जोडणी कशी मिळाली? अधिकृत सुविधा जोडणी देणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?’ असा प्रश्न रेहमान खान यांनी उपस्थित केला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा