छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला सिनेस्टाईल अटक केली आहे. या आरोपीने अत्यंत निर्घृण कृत्य केलं होतं. त्याने बिहारमध्ये तब्बल चार जणांना संपवलं होतं आणि तो छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : आपसात झालेल्या वादानंतर एकाच घरातील चार सदस्यांची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मेलेल्या सदस्यांचे अंग कापून एका सुटकेसमध्ये टाकून, नदीत फेकण्यात आले. ही घटना बिहारमध्ये कैमुर येथील रामगढ पोलीस ठाण्यातंर्गत घडली. निघृण हत्या करणाऱ्या आरोपींपैकी दोन जणांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्याचे नाव दिपक देवसिंग राजपूत (वय २७, रा. नाचनवेल, ता. कन्नड ह.मु. जाधववाडी), गौतम उर्फ राहुल करमपाल गुप्ता (वय २२, रा. आत्मज, कर्मपाल गुप्ता, ग्रा. डरहक, पो. रामगढ, जि. कैमुर, रा. बिहार) असे आहे.
या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमुर (बिहार ) येथील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांना पोलीस ठाणे रामगढ येथील खुन प्रकरणातील आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती दिली. ही माहिती फोनद्वारे तसेच ईमेलद्वारे देण्यात आली. रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुष्ण मुरारी गुप्ता, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा खुन करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दिपक राजुपत आणि गौतम करमपाल गुप्ता हे दोघे छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निघृण हत्या प्रकरणातील संशयीत आरोपींचा शोध सुरू केला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपक राजपूत आणि गौतम गुप्ता या दोघांची माहिती काढून शरद टी पॉईंट जाधववाडी येथून दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर करून ट्रान्झीट रिमांड घेऊन बिहार पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
चौघांचे अठरा तुकडे करून सुटकेसमध्ये टाकून फेकले नदीत
बिहार राज्यातील जिल्हा कैमुर येथे १० मे रोजी दुर्गावती नदी एक सुटकेस आढळली. या सुटकेसमध्ये तसेच काही गोण्यांमध्ये चार जणांचा १८ तुकडे आढळले. या प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला असता, कौटुंबीक वादातून मृत कृष्ण मुरारी गुप्ता याने काही दिवसांपूर्वी आई आणि भावाला मारहाण केली. या घटनेची माहिती मुख्य आरेापी विकास गुप्ता याला सांगितले. विकास गुप्ता हा महाराष्ट्रात काम करीत होता. विकास गुप्ता, विकासचा लहान भाऊ गौतम गुप्ता याच्यासह दिपक राजपुत यांनी अन्य आरोपींसह कृष्ण मुरारी गुप्ता, दुर्गेश कृष्ण मुरारी गुप्ता आणि त्यांचे दोन मुलं या चौघांची निघृण हत्या केली. तसेच मृतांच्या शरिराचे अठरा तुकडे करून दुर्गावती नदी सह परिसरात फेकून दिले. अशा निघृण हत्येच्या आरोपींपैकी दोघांना जाधववाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा