शिवराज मोटेगावकर याचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण सीबीआयने अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने मोटेगावकर याच्याबाबत न्यायालयात गंभीर माहिती दिली आहे. सीबीआयकडून या प्रकरणी कारवाई सुरु असतानाच आता ईडीदेखील या प्रकरणात सक्रीय होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण लातूरमध्ये सध्याच्या घडीला तशा घडामोडी घडताना दिसत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लातूर : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरु आहे. सीबीआयने आतापर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. अनेकांची धरपकड केली आहे. अनेकांची कसून चौकशी केली आहे. या प्रकरणात खासगी क्लास चालवणारे सीबीआयच्या रडारवर होते. तपासाचे चक्रे त्याच बाजूला फिरले आणि लातूरमधील एका मोठ्या खासगी क्लासच्या संचालकाला सीबीआयने अटक केली. ती व्यक्ती म्हणजे लातूरच्या आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सर. शिवराज मोटेगावकर याच्या क्लासच्या जाहिराती अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळाल्या आहेत. पण याच शिवराज मोटेगावकरचं खरे रुप अशाप्रकारे समोर येईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती.
सीबीआयने शिवराज मोटेगावकर याला अटक केली आहे आणि आज त्याला न्यायालयात हजर केलं. यावेळी सीबीआयने काही महत्त्वाचे मुद्दे मांडल्याची माहिती आहे. “सीबीआयने शिवराज मोटेगावकरच्या कोठडीची मागणी केली आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीतील शिवराज हा सक्रीय सदस्य आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे. नीटचा परीक्षा 3 मे रोजी झाली. पण त्याआधीट नीटची प्रश्नपत्रिका 23 एप्रिलला मोटेगावकर याच्याकडे मोबाईलमध्ये पोहोचली होती. मोटेगावकर याने ती प्रश्नपत्रिका पैसे घेऊन काही विद्यार्थी आणि पालकांना विकली. त्यानंतर त्याने ती प्रश्नपत्रिका आपल्या मोबाईलमधून डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिल्याची माहिती आहे.
“या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी हा लातूरचा आहे. त्यामुळे पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज नोटेगावकर यांचे आपापसात संबंध होते, दोघांनी मिळून पेपरफुटीचा कट रचला”, असं सीबीआयने न्यायालयाच म्हटल्याची माहिती आहे. सीबीआयकडून शिवराज मोटेगावकर याच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे. असं असतानाच आता ईडीदेखील या प्रकरणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिवराज मोटेगावकर याचे पाय आणखी खोलात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडत आहे?
NEET पेपरफुटी प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहाराच्या दिशेनेही तपासाची व्याप्ती वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. सीबीआयच्या तपासानंतर आता ईडीकडूनही आर्थिक व्यवहार आणि संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लातूरमधील ट्युशन क्षेत्रात काल दिवसभर मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू होत्या. विशेषतः उद्योग भवन परिसरातील विविध मालमत्ता, ट्युशनसाठी वापरण्यात येणाऱ्या जागा, आर्थिक उलाढाल आणि संबंधित व्यवहारांची माहिती गोळा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शिवराज मोटेगावकर यांच्या नावावर असलेल्या संपत्तीबाबत तपशीलवार माहिती घेतली जात असून, विविध आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कालपासून सीबीआयचे पथक त्यांच्या कार्यालयात दाखल झाले असून, आजही उद्योग भवन परिसरातील त्यांच्या मालमत्तांबाबत मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तपास यंत्रणांकडून आर्थिक कागदपत्रे, व्यवहार आणि संबंधित नोंदींची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोटेगावकरच्या अटकेनंतर लातूरमध्ये पडसाद
दरम्यान, शिवराज मोटेगावकर याच्या अटकेनंतर लातूरमध्ये पडसाद पडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लातूरच्या रेणुकाई क्लासेसवर शाई फेकत या घटनेचा निषेध केला आहे. यावेळी लातूरच्या सुखमिल रोड परिसरात उभा असलेल्या आरसीसी क्लासेसची इमारत अनाधिकृत असून यावरती बुलडोझर चालवा, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा