Beed News: उच्च न्यायालयाने बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांना सुट्टीच्या काळातच त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड: बीड जिल्ह्यातील अत्यंत चर्चेत राहिलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या खटल्याची नियमित सुनावणी घेणारे विशेष मकोका न्यायाधीश व्ही. एच. पटवदकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या नियमित बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, बीड येथील विशेष मकोका न्यायाधीश व्ही. एच. पटवदकर यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे बदली करण्यात आली आहे.
खटल्याची सद्यस्थिती आणि न्यायालयाचा आदेश न्यायाधीश पटवदकर यांच्या न्यायालयात मागील वर्षभरापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू होती. या खटल्यातील आरोपींवर दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही आरोपींनी या दोषारोपांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायाधीशांच्या बदलीमुळे आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी नवीन न्यायाधीशांसमोर चालणार आहे.
नवीन न्यायाधीशांची नियुक्ती न्यायाधीश व्ही. एच. पटवदकर यांच्या बदलीनंतर बीड येथील विशेष मकोका न्यायालयात धुळे येथून न्यायाधीश जे. आर. पुलाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश पुलाते हे अनुभवी न्यायाधीश असून त्यांनी आपल्या सेवाकाळात अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांवर निकाल दिले आहेत. आता त्यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मोठे आव्हान असणार आहे.
सरपंच हत्या प्रकरण बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने याची चौकशी सीआयडी आणि एसआयटी कडे सोपवली होती. तसेच, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय न्यायालयीन समिती देखील गठीत केली होती. या खून प्रकरणात मुख्य संशयित वाल्मिक कराडसह एकूण नऊ आरोपी सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असून तो फरार आहे.
दरम्यान, आता न्यायाधीश जे. आर. पुलाते बीड न्यायालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर या संवेदनशील खटल्याची सुनावणी कशी पुढे नेतात आणि या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल कधी लागतो, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा