• Wed. Sep 9th, 2026
कामे आम्ही मंजूर करायची आणि उद्घाटन तुम्ही करायचं? लंकेचा विखेंवर निशाणा


पारनेर तालुक्यातील विकासकामांच्या श्रेयावरून खासदार निलेश लंके आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या पारनेर दौऱ्यापूर्वीच खासदार लंके यांनी आक्रमक भूमिका घेत थेट टीकास्त्र डागलं. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. टीका करणाऱ्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी टीका करत राहावे. केवळ टीका करून स्वतःचे अपयश झाकता येत नाही असा टोला विखे पाटीलयांनी लंके यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed