Andheri-Goregaon Bridge: मुंबईतील उत्तर-दक्षिण मार्गांना जोडणाऱ्या ओशिवारा आणि गोरेगाव भागांतील वाहतूककोंडी फुटणार आहे. गोरेगावच्या खाडीवर हा पूल उभारण्यात येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शहराच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबई महापालिका एक नवा केबल-स्टेड पूल उभारत आहे. अंधेरी, ओशिवारा, लोखंडवाला आणि गोरेगावमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक नवा दुवा निर्माण होणार आहे. गोरेगावच्या खाडीवरून एक सहा पदरी पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे मुंबईतली महत्त्वाच्या लोखंडवाला जंक्शनमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
कसा असेल मार्ग?
सध्या मुंबईत एसव्ही रोड आणि लिंकिंग रोड, उत्तर-दक्षिण कॉरिडोर आहेत. या मार्गावर दिवसभर प्रचंड गर्दी व वाहतूककोंडी असते. हाजी अली जंक्शनप्रमाणेच मिल्लत नगरजवळील लोखंडवाला सर्कलमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ओशिवारा आणि भगतसिंह नगर या दोन महत्त्वाच्या मार्गांना लिंक रोडशी जोडणाऱ्या गोरेगाव खाडीवर पूल बांधण्यात येत आहे. यामुळे सिग्नल-मुक्त प्रवास शक्य होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे मुंबईतील महत्त्वाच्या लोखंडवाला सर्कलमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.Mumbai-Pune Expressway’s Missing Link: ‘कनेक्टिंग लिंक’वर ‘नो कनेक्टिव्हिटी’! बोगद्यामध्ये जाताच नेटवर्क गायब; प्रवाशांकडून चिंता व्यक्त
त्यानंतर, कोस्टल रोडच्या उत्तरेकडील वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशीही या पुलाचा एक भाग जोडला जाणार आहे. त्यामुळे उत्तर, दक्षिण आणि पश्चिम मुंबईदरम्यान प्रवास सोपा आणि वेगवान होणार आहे. या पुलाची लांबी 542 मीटर आहे. यापैकी 238 मीटर लांब भाग केबल-स्टेड असणार आहे. संपूर्ण पुलाची रुंदी 28.55 मीटर असेल. मार्गाच्या प्रत्येक बाजुला 1.5 मीटर यूटिलिटी कॉरिडोर बांधण्यात येणार आहेत.
36 महिन्यांत काम पूर्ण
हा मार्ग सहा पदरी असून, तीन लेन उत्तरेकडील जाणाऱ्या मार्गावर असतील तर तीन लेन दक्षिणेकडील जाणाऱ्या मार्गावर असतील. या प्रकल्पासाठी एकूण 418.53 कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलाचं काम पूर्ण करायला 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे (मान्सूनचा काळ वगळून).
Third Mumbai: ‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यायी उत्तर-दक्षिण मार्गाने ओशिवरा आणि गोरेगावशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासारखे नवीन प्रकल्प या भागात येत असल्याने येत्या काही वर्षांत नागरिकांना फायदा होईल. बांधकामाचा कालावधी कमी करण्यासाठी, महापालिकेने केबल-स्टेड डिझाइन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामासाठी कमी वेळ लागतो आणि कमी पियरमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा