Nashik Drown Death: नांदूरशिंगोटे येथील नागरे वस्ती परिसरातील बंधाऱ्यात बुडून 28 वर्षीय महिला व तीन चिमुकल्यांचा करुण मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृतांमध्ये मनीषा विजय रामजोशी (वय २८), तिचा मुलगा कार्तिक विजय राम जोशी (११), तसेच भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.
Nashik News : पुण्याहून नाशिकला लग्नाला, आईचं दूध प्यायल्यानंतर चिमुकलीची हालचाल थांबली; चार महिन्याच्या लेकीच्या मृत्यूचं खरं कारण समोर
डिग्रस येथील हे कुटुंब पुणे येथे नाली खोदकामाच्या कामासाठी निघाले होते. इतर नातेवाइकांची वाट पाहण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. मुक्कामाच्या ठिकाणाजवळील नागरे बंधाऱ्यावर शनिवारी मनीषा रामजोशी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या. सोबत कार्तिक, आदित्य आणि अविनाश हेही गेले होते.
बराच वेळ उलटूनही चौघे परत न आल्याने विजय रामजोशी आणि राहुल शिंदे यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तेथे कपडे आणि चपला आढळल्याने संशय बळावला. यानंतर दोघांनीही बंधाऱ्यात उतरून शोध सुरू केला. काही वेळातच चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Nashik Crime: नाशिकमध्ये माणुसकी ओशाळली! 70 वर्षीय नराधमाचा 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, घटनेनं संताप
तर दुसऱ्या एका घटनेत, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती तलावात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. हिंगणी (ता. धारूर) येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील एका महिलेसह सहा मुली शनिवारी १२ वाजण्याच्या दरम्यान हिंगणी येथील सरस्वती तलावावर गेल्या होत्या. यातील तीन मुली थर्माकॉलच्या तराफ्यावरून तलावात उतरल्या. अचानक तराफा पलटी होऊन पलक पारवे, दिव्या कांबळे आणि मोहिनी पारवे पाण्यात पडल्या. यातील पलक श्याम पारवे आणि दिव्या विकास कांबळे व यांचा बुडून मृत्यू झाला .
