• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur News: विदर्भातील शेती अवशेषांतून इंधन निर्मिती; राज्य शासनाचे नवीन बायोगॅस धोरण ठरणार वरदान

    Maharashtra State Compressed Biogas Policy 2026: विदर्भातील शेतीचा मुख्य आधार असलेल्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांच्या अवशेषांपासून आता स्वच्छ इंधन तयार केले जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडेल, असा विश्वास औद्योगिक संघटनांनी व्यक्त केला आहे.

    विदर्भाती शेती अवशेषांतून इंधन निर्मिती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेले महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण विदर्भाच्या ग्रामीण आणि औद्योगिक विकासासाठी एक गेमचेंजर ठरणार आहे.

    विदर्भात कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र मोठे असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात कृषी अवशेष उपलब्ध असतात. या धोरणामुळे हे अवशेष उघड्यावर जाळण्याऐवजी त्यांचा वापर इंधन निर्मितीसाठी केला जाईल. कापूस उपटल्यानंतर उरणारी पऱ्हाटी आता प्रकल्पांसाठी कच्चा माल म्हणून वापरली जाईल. विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कच्चा माल संकलनासाठी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत यंत्रसामग्री आणि आर्थिक सहाय्य दिले जाईल. शेतीचा कचरा जाळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणार आहे.

    Maharashtra TimesNagpur Crime: ‘मला शेवटचं बघून घे’; प्रेयसीशी Video Call सुरू असतानाच तरुणाचं टोकाचं पाऊल, धक्क्यातून तरुणीनेही…
    विदर्भातील उद्योजकांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी शासनाने मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत प्रकल्पाच्या क्षमतेनुसार प्रतिटन ७५ लाख रुपये किंवा कमाल १५ कोटी रुपयांपर्यंत व्यवहार्यता तफावत निधी अनुदान दिले जाईल. प्रकल्प उभारणीसाठी शासकीय जमीन रेडीरेकनर दराच्या केवळ ०.७ टक्के नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिली जाईल.

    या प्रकल्पांना पायाभूत सुविधा म्हणून दर्जा देण्यात आल्याने त्यांना प्राधान्याने वीज आणि पाणी उपलब्ध करून दिले जाईल. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नागपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे कृषी मालाची मोठी आवक असते, तिथे बायोगॅस क्लस्टर्स विकसित केले जातील. यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संकलन आणि वितरण साखळीत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

    Maharashtra TimesNagpur Crime : हा माज येतो कुठून? टवाळखोरांचा पट्रोल पंपावर कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद
    जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी
    विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कॉम्प्रेस्ड बायोगॅस समन्वय समिती कार्यरत असेल. ही समिती प्रकल्पांसाठी जागा शोधणे, जमीन वाटप करणे आणि स्थानिक स्तरावरील परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा पुरवण्याचे काम करेल.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा