Praful Patel: राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, तटकरे आणि पटेल यांचे पक्षातील स्थान कायम असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
रोहित पवार आणि प्रफुल पटेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला काहीसा विराम मिळण्याची चिन्हे आहेत. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे अजूनही पदाधिकारी असून त्यांना पदच्युत केलेले नसल्याचे शनिवारी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाला सुधारित पत्र देणार असून त्यानंतर हे गैरसमज निकालात निघतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. पक्षाविषयी उलटसुलट चर्चांना विराम मिळावा, यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे स्पष्टीकरण देत असल्याचे पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर, पुन्हा २९ एप्रिल रोजी नवे पत्र पाठवत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकार्यांची यादी देण्यात आली. यातही पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यावरून, या दोघांनाही पदावरून हटवले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. सुनेत्रा पवार यांनी तातडीने स्पष्टीकरण देत, ही कारकुनी चूक असल्याचे सांगितले होते. तरीही पटेल आणि तटकरे यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह होते. याबाबत आता पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने, अजित पवार यांच्या निधनानंतर तात्काळ काही कागदपत्रे देण्याच्या वकिलांच्या सूचना होत्या. त्यामुळे ही तात्पुरती यादी करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकारी समिती ही सर्वोच्च आहे. याच समितीला पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याची आणि त्यातील नियुक्त्यांचे अधिकार आहेत, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
‘निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या कार्यकारी समिती आणि पदाधिकारी समिती या दोन पत्रांमध्ये पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख राज्यसभा गटनेते असा असला, तरी ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राहतील. सुनील तटकरे यांच्याही पदाचा उल्लेख नसला, तरी ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहतील,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांवर गंभीर आरोप
‘अजित पवार यांचा सर्वांत जास्त छळ करण्याचा प्रयत्न हा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांची राजधानी असलेल्या बारामतीवर रोहित पवार यांचा डोळा आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी रोहित पवार हे ढोल बडवत आहेत. ते अजित पवार यांचा वारसा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजितदादांच्या पक्षाची चिंता रोहित पवार यांनी करू नये. तुमच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत. पण आम्ही आतापर्यंत आम्ही हा निर्णय घेतला नाही आहे,’ असे उमेश पाटील यावेळी म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा