• Tue. Jun 16th, 2026
    Sugar Export Ban: साखर कारखाने अडचणीत; केंद्राने निर्यात बंदी उठवण्याची साखर महासंघाची मागणी

    Sugar Export Ban: आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने साखरेवरील निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी पाटील यांनी या वेळी केली.

    साखर कारखाना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: साखर निर्यातीवर केंद्र सरकारने अचानक घातलेल्या बंदीचे पडसाद आता साखर उद्योगात उमटू लागले आहेत. निर्यातीसाठी आधीच करार केलेले व्यवहार, बंदरांकडे रवाना झालेली साखर आणि स्वीकारलेली आगाऊ रक्कम यामुळे कारखाने आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी केला.

    केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या ऊस नियंत्रण कायद्याच्या मसुद्यावर देशातील ५४१ साखर कारखान्यांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची शनिवारी पुण्यात बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी माहिती दिली. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे या वेळी उपस्थित होते.

    Maharashtra TimesManisha Mandhare : नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेली मनिषा मांढरे कोण? मुख्याध्यापिकांकडून महत्त्वाची माहिती
    केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऊस नियंत्रण कायद्याच्या मसुद्यामध्ये सुधारणा आणि शिफारशी असणारा एक अहवाल २० मेपर्यंत केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

    निर्यातीसाठी करार
    ‘केंद्र सरकारने यापूर्वी १५ लाख टन आणि त्यानंतर पाच लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यांपैकी सुमारे साडेनऊ लाख टन निर्यातीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक कारखान्यांनी निर्यातीसाठी करार केले असून, निर्यातदारांनी आगाऊ रक्कमही जमा केली आहे. त्यामुळे आगामी काळात आर्थिक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असेही पाटील म्हणाले.

    Maharashtra TimesPune Bishnoi Gang : ‘हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट…’; पुण्यात फर्निचर मॉलवर गोळीबार, लॉरेन्स बिष्णोई गँगचा धुमाकूळ, शुभम लोणकरची FB पोस्ट
    कायद्यात स्पष्टता हवी
    एफआरपी निश्चित करण्यासाठी नेमकी कोणत्या हंगामाची रिकव्हरी विचारात घ्यावी, याबाबत कायद्यात स्पष्टता असावी आणि त्यासाठी चालू हंगामाचीच रिकव्हरी ग्राह्य धरली जावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी केली; तसेच शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यास उशीर झाल्यास त्यावर १२ टक्के दराने व्याज आकारले जावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.

    साखर उद्योगाचे भविष्य संकटात ?
    ‘साखर उद्योगांसाठी सलग दहा वर्षांसाठी धोरण ठरवण्यात यावे, त्यामध्ये वारंवार बदल केले जावू नये,’ असे आवाहन महासंघाने केले. इथेनॉल दर, सह वीज निर्मिती दर याबाबत नेमके धोरण ठरवण्याची गरज आहे. साखरेची मागणी घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर कमी होत आहे. उत्पन्नही कमी होत आहे. ऊस लागवड केली नाही, तर व्यवसाय अडचणीत येईल. सध्या कारखानेही अडचणीत असल्याने पुढील हंगामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी साखरेचे आणि इथेनॉलचे दर एफआरपीशी थेट निगडित असणे गरजेचे आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा