• Sat. Jun 6th, 2026

    Kolhapur News: जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं; पुण्यातील व्यक्तीची कोल्हापुरात धक्कादायक अखेर

    Kolhapur News: जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं; पुण्यातील व्यक्तीची कोल्हापुरात धक्कादायक अखेर

    Accident News: सोशल मीडियावर लिहिलेल्या भावनिक पोस्टमधूनत्यांच्या एकटेपणाची आणि असह्य दु:खाची सल स्पष्टपणे दिसून येत होती.

    जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: नोव्हेंबर 2023 मध्ये गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी आराम बस पिरवाडी–पुईखडी घाटात उलटल्याने झालेल्या भीषण अपघात झाला होता. या अपघातात आपली पत्नी आणि दोन लहान मुलांना गमावल्यानंतर पुण्यातील रहिवासी विराट विठ्ठललाल गौतम (वय 58, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) हे गृहस्थ आपल्या कुटुंबात एकटेच बचावले होते. मात्र यानंतरचा काळ पूर्णपणे नैराश्यात गेल्यामुळे त्यांनी देखील आपल्या कुटुंबाला गमावल्यानंतर जवळपास अडीच वर्षांनी त्याच अपघातस्थळी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील राधानगरी रोडवर पुईखडी घाटात उघडकीस आली आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी घाटात काही वाहनधारकांना रस्त्यापासून काही मीटर अंतरावर आतमध्ये एक मृतदेह अगदी सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर व्यक्तीच्या मृतदेहाजवळ काही पिशव्या आणि इतर साहित्य दिसल्याने त्यांनी करवीर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या करवीर पोलीस निरीक्षकांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. व्यक्तीच्या खिशातील ओळखपत्रावरून ते पुण्यातील विराट गौतम असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असावी, अशी शक्यता व्यक्त करत पोलिसांनी पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठवला. अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण जाहीर होणार आहे.

    पूर्वीची ती भयावह घटना

    23 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी स्लीपर बस (MH12 TV 1658) कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी रोडवरील पिरवाडी-पुईखडी घाटातील वळणावर उलटली होती. त्या दुर्घटनेत पुणे येथील मांजरी बुद्रुक परिसरातील विराट यांची पत्नी नीलू विराट गौतम (वय 43), मुलगी रिद्धिमा गौतम (वय 17) आणि मुलगा सार्थक गौतम (वय 13) यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या वेळी विराट हे जखमी अवस्थेत बचावले होते. या घटनेत एकूण 25 प्रवासी बसमध्ये होते; तीन जणांचा मृत्यू झाला आणि बाकीचे जखमी झाले होते. करवीर पोलिसांनी त्या अपघातात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    त्यानंतर दोन वर्षांपासून विराट यांचे जीवन अत्यंत दुःखदायी राहिले होते. पोलिस आणि नातेवाईकांच्या माहितीनुसार, ते नियमितपणे पिरवाडी घाटात येऊन तिथे तीन पुष्पहार ठेवून कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहत असत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विराट हे 10 मे रोजी पुन्हा पिरवाडी घाटात आले होते; त्यांना तेथे फिरताना काही व्यक्तींनी पाहिले होते. मात्र, नंतर त्याच ठिकाणी दुर्दैवीरीत्या त्यांचा मृतदेह आढळला.

    आपलं आयुष्य संपवण्याआधी देखील त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. “आज कोल्हापुरात देहत्याग केला आहे. मी कसा जगत आहे हेच मला कळत नाही. या जगात काही माणसे अशी असतात, ज्यांच्याशिवाय जगणे खूप कठीण असते. ते गेल्यावर मी कसा जगत आहे, हाच प्रश्न मला पडतो. माझे जग त्याच क्षणी संपले. नीलू, रशिका, सर्विलशिवाय मी अडीच वर्षे कसा जगलो, हे मला समजत नाही.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.

    करवीर पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सापडलेले सर्व पुरावे तपास अधिकाऱ्यांकडे नोंदवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल, सोशल मीडिया पोस्ट आणि त्यांच्या व्यक्तिगत वस्तूंच्या आधारे पुढील तपासात अधिक तपशील लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेने कोल्हापूरसह पुण्यातील त्यांच्या कौटुंबिक वर्तुळात अत्यंत दारुण शोककळा पसरली असून, अशा दुःखात असलेल्या व्यक्तींना वेळेत मानसिक आरोग्य सेवा आणि मानसिक सहाय्य मिळावे यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा