• Sat. Jun 6th, 2026
    Buldhana Crime: ‘मीच केलं…’ म्हणत नवरा स्वतः पोलीस ठाण्यात; बुलढाण्यातील दोन घटनांनी परिसरात खळबळ

    Buldhana Crime News: बुलढाण्यातील खामगाव येथे पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा : सात जन्म साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या पत्नीचाच नवऱ्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मायावती शहादेव भारसाकळे असे मृत महिलेचे नाव आहे. तर शहादेव शंकर भारसाकळे असे आरोपी पतीचे नाव आहे. ही घटना खामगाव रेल्वे गेटलगतच्या झोपडपट्टी परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

    दुसरी घटना

    दुसऱ्या एका घटनेत प्रकाश रूपलाल सोळंके आणि त्याची पत्नी सविता यांच्यात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या प्रकाशने पत्नी सविताच्या डोक्यात लोखंडी सब्बलने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. शेजारी राहणाऱ्या पूजा रमेश सोळंके यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने संजय मेढे यांना माहिती दिली.

    “मी सविताला मारले आहे…”

    संजय मेढे घटनास्थळी पोहोचले असता सविताच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले. आरोपी प्रकाश हा हातात लोखंडी सब्बल घेऊन घटनास्थळी उभा होता. यावेळी मेढे यांनी त्याला विचारणा केली असता, “मी सविताला मारले आहे, आता स्वतः पोलिस स्टेशनला जात आहे,” असे सांगून तो तेथून निघून गेला.

    Maharashtra TimesWeather Forecast: महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर, उन्हाचा तडाखा, अवकाळी अन् आता मान्सूनचीही मोठी अपडेट

    दरम्यान, आरोपी थेट शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. पत्नीला ठार केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. माहिती मिळताच ठाणेदार रामकृष्ण पवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत बॉडी पीएमसाठी सामान्य रुग्णालयात पाठवली.

    या प्रकरणी संजय शेणाजी मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय विकास पाटील करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा