• Fri. Jul 3rd, 2026

    मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे नवीन कारागृह उभारणीसाठी ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन सुपूर्द – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 15, 2026
    मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे नवीन कारागृह उभारणीसाठी ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन सुपूर्द – महासंवाद

     मुंबई, दि. १५ : राज्यात विद्यमान कारागृहांवरील वाढता ताण लक्षात घेऊन नवीन कारागृह उभारण्यासाठी जागेचा अनेक वर्ष शोध सुरू होता. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेल्या सुमारे 11 एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवून, सदर जमीन मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कुर्ला तालुक्यातील मौजे मानखुर्द येथील या जमिनीचा ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना देण्यात आला.

    मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. 8 एप्रिल 2026 रोजी एका दिवसात 1200 पेक्षा अधिक झोपड्या हटवून सुमारे 11 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.

    यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, मौजे मानखुर्द येथील ही 11 एकर शासकीय जमीन नवीन कारागृह उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग तसेच अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांनी सदर जमिनीची मागणी केली होती.

    प्रशासनाच्या समन्वयातून आणि महसूल विभागाच्या प्रभावी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन ताब्यात घेण्यात यश आले आहे. राज्यातील वाढती कैद्यांची संख्या आणि कारागृहांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

    ००००

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed