• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News 15th May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पावसाचे संकट, मराठवाड्यात 18 मेपर्यंत पाऊस

मराठवाड्यात मागील चार दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. आणखी दोन दिवस ही लाट कायम राहणार आहे. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात १५ आणि १६ मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात १८ मेपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होणार आहे. चार दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र झाली असून गुरुवारीही छत्रपती संभाजीनगरसह विभागात तापमानाने उसळी घेतली होती. शहरात कमाल ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या आठवड्यात उष्णतेची लाट आणि पाऊस अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed