Dr Anand Nadkarni Passed Away : मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात डॉ आनंद नाडकर्णी यांचं अतुलनीय योगदान होतं. वयाच्या ६८ व्या वर्षी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ आनंद नाडकर्णी यांचे निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवार १५ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाने त्यांचा मित्र परिवार, चाहतावर्ग यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मानसोपचार क्षेत्रात मोलाचं योगदान
डॉ आनंद नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदव्युत्तर शिक्षण घेतले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय होते. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) आणि मुक्तांगण डी-अॅडिक्शन सेंटरचे ते संस्थापक होते. लेखक, नाटककार, कवी, संगीतकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ नाडकर्णी यांची ओळख होती.
Rupali Chakankar | भोंदूबाबा अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी फोटोचं चाकणकरांकडून स्पष्टीकरण
Prateek Yadav : मुलींच्या सहवासाची आस, घरी जाण्याची ओढ; डॉक्टरी सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज घेतला, प्रतीक यादवसोबत 12 दिवसात काय घडलं?
मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीचं काम
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात डॉ आनंद नाडकर्णी यांचं अतुलनीय योगदान आहे. सोशल मीडियातूनही डॉ आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागृत करण्याचं काम केलं आहे. डॉ आनंद नाडकर्णी यांचा विविध विषयांचा व्यासंग होता. पुस्तकं, पॉडकास्ट मुलाखतींच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याचे विविधांगी कंगोरे उलगडून दाखवले. मानसिक आरोग्य संस्था – IPH ( Institute for Psychological Health ) च्या माध्यमातून डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत समाजाभिमुख काम केलं आहे. Petrol Diesel Price : देशभरात इंधन दरवाढीचा धक्का, मुंबईत पेट्रोलची किंमत तब्बल 3.14 रुपयांनी वाढली, सर्वाधिक भाववाढ कोकणात
मृत्यूशी झुंज अपयशी
गेल्या काही काळापासून ते आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपुरी पडली आणि वयाच्या ६८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. लेखिका वीणा गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी फेसबुकच्या माध्यमातून डॉ. नाडकर्णी यांना आदरांजली वाहिली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा