राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. तसेच ते स्वत: एकेकाळी भाजपात जाण्यासाठी इच्छूक होते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा दावा केला. “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आगामी निवडणुका भाजपमधून लढणार आहेत. त्यांच्यासह 22 आमदारांचे देखील भाजप प्रवेशाचे ठरले आहे. ते आमदारही भाजपातून लढणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या आमदारांचादेखील समावेश आहे”, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. “आता लगेच पक्षप्रवेश केला तर पुन्हा निवडणुका लागतील. त्यामुळे पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही”, असा दावादेखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांना आता सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
“रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते स्वत: भारतीय जनता पक्षात जाण्यासाठी अनेक काळ इच्छुक होते. त्यांनी आमच्या निष्ठेचा, आमच्या पुरोगामी विचारांच्या गप्पा मारण्याचे कारण नाही. त्यांचा हा नैतिक अधिकार सुद्धा नाही. त्यांनी आपलं स्वत:चं जे चाललं आहे ते तपासावं”, असं खोचक प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालवधीत NDA अधिक मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्रात महायुती बळकट करण्याचे आमचे काम सुरु आहे. बुद्धीभेद पसरवण्याचा धंदा काही लोक करत आहेत, तो त्यांना लखलाभ”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता, “हे अत्यंत चुकीचं आणि निराधार आहे. या चर्चांना काहीच अर्थ नाही”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवरही चर्चांना उधाण
दरम्यान, सुनील तटकरे यांनी मंगळवारी ( 12 मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली असावी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे. तेवढंच कारण त्या पाठिमागे होतं. कुठलंही राजकारण त्या भेटीमागे नाही, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनीदेखील ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यामध्ये काही अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवरुन राजकीय वावड्या उठवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा