• Mon. Jun 15th, 2026
    Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आरोप फेटाळले, ठाणे न्यायालयात नेमकं काय घडलं?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयातील सुनावणीच्या कारणास्तव ठाण्यात दाखल झाले. ते ठाणे न्यायालयात हजर झाले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले. राज ठाकरे यांनी मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका मांडली होती. रेल्वेसाठी होणाऱ्या परिक्षा या मराठी भाषेतही घेण्यात याव्या, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. या मागणीसाठी 2008 मध्ये मनसेकडून मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. मराहाराष्ट्रात होणाऱ्या रेल्वे भरतीच्या परिक्षा या मराठीत देखील घेण्यात याव्यात, अशी सर्वांची प्रमुख मागणी होती. या प्रकरणावरुन वाद वाढल्यानंतर कल्याण स्थानकावर एक अनपेक्षित घटना घडली होती. कल्याण स्थानकावर काही परप्रांतीय उमेदवारांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे न्यायालयात हजर राहावं लागलं.

    मराठी तरुणांना महाराष्ट्रात हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, हा मुद्दा हाती घेत २००८ मध्ये रेल्वे भरती परीक्षेपूर्वी कल्याण स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांवर आरोप झाले आहेत. या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी बुधवारी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर होते. यावेळी न्यायालयात ठाकरे यांनी या प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले.

    नेमकं काय घडलं?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००८ मध्ये रेल्वे भरती परिक्षेदरम्यान परप्रांतीय उमेदवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांनी मारहाण झाल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. याआधी या गुन्ह्याची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरु होती. त्यानंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले.

    त्यानुसार, या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात सुरु होती. या सुनावणीसाठी ठाकरे यांच्यासह सहाजण न्यायालयात हजर झाले. यावेळी सुनावणी दरम्यान हे प्रकरण बनावट असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी आरोप फेटाळून लावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मे रोजी होईल, अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील शैलेश सडेकर यांनी दिली.

    मनसे नेते हजर, कार्यकर्त्यांचीही गर्दी

    ठाकरे यांच्या सुनावणीवेळी मनसे नेते, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव न्यायालयात हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य चौकांत फलक झळकवण्यात आले होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा