#rohitpawar #suniltatkare #ncpसुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत खळबळ उडवणारं वक्तव्य केलंय. तटकरे आणि पटेल यांचं ठरलंय, काहीही झालं तरी ते भाजपातून लढणार असा दावा रोहित पवारांनी केलाय. यावर सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते स्वतः भाजप मध्ये जाण्यास इच्छुक आहेत. आमच्या निष्ठेबाबत गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्यांचे स्वतःचे काय चालले आहे ते तपासावे. आम्ही आमच्या हिमतीने उभे आहोत.राज्याच्या उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती बळकट करण्याचे काम सुरू आहे असं तटकरे म्हणाले.