NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. बिबवेवाडीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका संशयीत महिलेला आता गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून अहिल्यानगर कनेक्शनमुळे हा उलगडा झाला आहे. याप्रकरणाचा तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. लातूर आणि अहिल्यानगरनंतर आता पुण्यातही या रॅकेटचे कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पहाटे बिबवेवाडी परिसरात एक मोठी आणि अत्यंत गोपनीय कारवाई केली. या कारवाईत एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्या अटकेमुळे या घोटाळ्याचे नेटवर्क किती खोलवर पसरले आहे, याचा धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही महिला बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवत असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अहिल्यानगर कनेक्शनमधून फुटले बिंग
या प्रकरणाची पाळेमुळे शोधताना पोलिसांना अहिल्यानगरमध्ये (अहमदनगर) अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेच्या चौकशीतून अनेक धागेदोरे मिळाले होते. लोखंडेच्या चौकशीदरम्यान या महिलेचे नाव समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ही महिला विद्यार्थ्यांना हेरून त्यांना धनंजय लोखंडे नावाच्या मध्यस्थापर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती का? याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. एकीकडे ब्युटी पार्लरचा व्यवसाय दाखवायचा आणि दुसरीकडे पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करायचे, असा हा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये काय?
आज पहाटे जेव्हा पुणेकरांना जागही आली नव्हती, तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित महिलेच्या घरावर आणि पार्लरवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धनंजय लोखंडे आणि महिला यांच्यामध्ये अनेक वेळा व्हॉट्सअॅप कॉल्स आणि संशयास्पद मेसेजेसची देवाणघेवाण झाली आहे. या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये काही महत्त्वाच्या विद्यार्थ्यांची नावे आणि आर्थिक व्यवहारांचे आकडे दडलेले असू शकतात, असा संशय तपास यंत्रणांना आहे.
Kerala Congress Dispute: ‘वेणुगोपाल मुख्यमंत्री झाले, तर वायनाडचं अमेठी होईल!’ केरळमध्ये थेट राहुल-प्रियंका गांधींविरोधात पोस्टरबाजी
आता ‘सीबीआय’च्या रडारवर!
पुणे पोलिसांची गुन्हे शाखा सध्या यातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी करत आहे. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता, संबंधित महिलेला पुढील तपासासाठी सीबीआयच्या ताब्यात दिले जाण्याची दाट शक्यता आहे. नीट परीक्षेसारख्या संवेदनशील विषयात दररोज नवे खुलासे होत असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे. या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ नेमका कोण आणि या साखळीत आणखी किती ‘बडे मासे’ आहेत, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा